कॅन्टीनचालकावर चाकूहल्ला करून लूट

By Admin | Updated: April 5, 2015 00:30 IST2015-04-05T00:29:59+5:302015-04-05T00:30:31+5:30

कॅन्टीनचालकावर चाकूहल्ला करून लूट

Plunder the cantepechalker | कॅन्टीनचालकावर चाकूहल्ला करून लूट

कॅन्टीनचालकावर चाकूहल्ला करून लूट

  नाशिक : पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून सात संशयितांनी कॅन्टीनचालकास मारहाण व चाकू हल्ला करून त्याच्याजवळील रोख रक्कम लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़२) रात्री मेहेर सिग्नलजवळील मित्रविहार स्पोर्ट क्लबमध्ये घडली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेहेर सिग्नलवरील मित्रविहार स्पोर्ट क्लबची कॅन्टीन शब्बीरखान जाँबाजखान पठाण (६४,रा़स्वामी विवेकानंदनगर, राणेनगर, सिडको) हे चालवितात़ गुरुवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास संशयित बाबा उर्फ दीपक दत्तात्रय जाधव, किरण पाटील, विकी उर्फ टमाट्या, अक्षय राजू बर्डे, काळू, लखन परदेशी, विजय बैसाणे हे कॅन्टीनमध्ये आले व पैशांची मागणी केली़ मात्र, पठाण यांनी संशयितांना पैसे देण्यास नकार दिला़ या गोष्टीचा राग येऊन संशयितांनी पठाण यांनी जिवे ठार मारण्याची धमकी देत डोक्यावर चाकूचे वार करून मारहाण केली़, तर काहींनी त्यांच्याजवळील ३ हजार ८०० रुपये बळजबरीने काढून घेऊन पळून गेले़ याप्रकरणी पठाण यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, यातील काही संशयितांना अटक केली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Plunder the cantepechalker