शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारपासून पिंपळगावला ‘टोल’धाड

By admin | Updated: November 14, 2015 23:10 IST

अवजड वाहनांना भुर्दंड : सहमतीसाठी बैठकीचे आयोजन

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर येत्या बुधवारपासून मोठ्या अवजड (सहा व त्यापेक्षा अधिक टायर असलेल्या) वाहनांच्या टोलमध्ये वाढ लागू करण्यात येणार असून, स्थानिक ग्रामस्थ तसेच जिल्हावासीयांच्या अवजड वाहनांना देण्यात आलेली यापूर्वीची सवलतही काढून घेण्यात येणार असल्याने महामार्गावरील ‘टोलधाड’ अटळ मानली जात आहे. पिंपळगाव येथील पिएनजी कंपनीने गेल्या आठवड्यात नोटीस काढून सर्व प्रकारच्या वाहनांच्या टोलमध्ये सोमवार, दि. १५ च्या मध्यरात्रीपासून वाढ करण्याचे जाहीर केले होते, त्याच्या विरोधात पिंपळगावच्या ग्रामस्थांनी दुसऱ्याच दिवशी टोलनाक्यावर आंदोलन करून टोल बंद पाडल्याने या संदर्भात तोडगा काढण्यासाठी निफाड तहसीलदार, टोल व्यवस्थापन व ग्रामस्थांची बैठक होऊन सोमवारपासून लागू होणाऱ्या दरवाढीवर सहमतीने तोडगा काढण्याचे व तोपर्यंत वाढ न करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यामुळे सोमवारपासून लागू होणारी दरवाढ तूर्त टळली असली तरी, मंगळवारी या संदर्भात निफाड तहसीलदार संदीप अहेर यांनी टोल व्यवस्थापन, स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक बोलविली असून, त्यात टोल व्यवस्थापन टोल वाढीबाबतचे त्यांचे म्हणणे मांडणार आहे. तत्पूर्वी पीएनजी कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन टोलवाढीबाबत चर्चा केली होती, मे २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक व जिल्ह्यातील वाहनांना दिलेली टोल सवलत कायम ठेवायची की काढायची यावर विचार विमर्ष करण्यात आला.तहसीलदारांनी बोलविलेल्या मंगळवारच्या बैठकीत टोलवाढीबाबत चर्चा करण्यात येऊन बुधवारपासून वाढीव टोलवसुली सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात मल्टी एक्सेल व्हेईकल म्हणजेच सहा किंवा त्यापेक्षा अधिक टायर असलेल्या वाहनांच्या टोलमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यात साधारणत: ट्रेलर, कंटेनर, मोठ्या ट्रक्सचा समावेश असेल त्यांना साधारणत: एकेरी फेरीसाठी ६९० ते ८९० रुपये भुर्दंड बसणार आहे. पहिल्या टप्प्यातील टोल वाढीनंतर टप्पाटप्प्याने अन्य वाहनांसाठी टोल वाढ करण्यात येणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.