शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्र दिन : छायाचित्र प्रदर्शनाला प्रतिसाद

By admin | Updated: August 20, 2014 00:42 IST

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट

नाशिक : मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना बाहेर आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वत:ला जाळून घेणारा युवक, साप-मुंगसाची लढाई, विहंगम गोदाघाट यापासून ते राजकारणाबाहेर मैत्रीचे बंध टिकवून ठेवणाऱ्या मुंडे-देशमुख यांचे दिलखुलास हास्य यांसह अनेकविध प्रसंग आपल्या कॅमेऱ्यातून टिपणाऱ्या वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन पाहून रसिकांना गदिमांच्या गीतरामायणातील ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ या ओळीची सहज आठवण झाली.कुसुमाग्रज स्मारकात जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधत नाशिकमधील वृत्तपत्र छायाचित्रकार एकत्र आले आणि त्यांनी स्थापन केलेल्या नाशिक प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे उद्घाटन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी कॅमेरा क्लीक करून केले. याचवेळी निवडक छायाचित्र प्रदर्शनही भरविण्यात आले होते. यावेळी छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा देताना ओबीसी वित्तीय महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद यांनी छायाचित्रांचे प्रदर्शन मोठ्या स्वरूपात भरविण्याची इच्छा प्रदर्शित केली. याचबरोबर संघटनेने छायाचित्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचीही सूचना केली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार प्रसाद पवार यांनी एरिअल फोटोग्राफीसंबंधी माहिती देत, लवकरच पांडवलेणीवरून दिसणाऱ्या फाळके स्मारकाची छायाचित्रे लोकांसमोर मांडणार असल्याचे सांगितले. महापौर यतिन वाघ यांनी छायाचित्रकारांच्या कौशल्याचे कौतुक करत महापालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. यावेळी गांवकरीचे संपादक वंदन पोतनीस, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ कोकरे यांनी, तर सूत्रसंचालन नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी केले. सचिन निरंतर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)