भ्रष्टाचाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका

By Admin | Updated: September 17, 2014 00:01 IST2014-09-15T00:39:16+5:302014-09-17T00:01:54+5:30

भ्रष्टाचाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका

Petition in the High Court Against Corruption | भ्रष्टाचाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका

भ्रष्टाचाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका


ंमालेगाव : मालेगाव महानगरपालिका स्थापन झाल्यापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधितांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच फौजदारी खटले दाखल करावे अशी जनहितयाचिका नगरसेविका सौ. पूनम सावळे, शिक्षक सोहेल अहमद व अबुजर अन्सारी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने चौकशी आयोग नेमून चौकशीत दोषी असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बेकायदेशीर नियमबाह्य जे ठराव महापालिकेत आजपर्यंत झालेत ते रद्द करण्यात यावे असे जनहितयाचिकेत म्हटले आहे.

Web Title: Petition in the High Court Against Corruption