शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यात अडीच लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:47 IST

गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक होत असल्याने पेठ पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून, एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा मद्यतस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलिीसांना यश आले आहे.

पेठ : गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक होत असल्याने पेठ पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून, एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा मद्यतस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलिीसांना यश आले आहे.शनिवारी सकाळी गुजरात राज्यातून येणारी खासगी कार (क्र . एमएच ०३ सीएम २४०४) पोलिसांनी चेकनाक्यावर थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने संधी साधून कार वेगात घेऊन नाशिककडे पळून जाण्याचा प्रयत्न केला. सदरची बाब पोलीस उपनिरीक्षक भरसट यांना समजल्यावर त्यांनी गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना कळवले. पोलीस नाईक किरण बैरागी व सुनील तुंगार यांच्या मदतीने करंजाळी येथे नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांचा पाठलाग व समोर नाकाबंदी पाहून वाहन चालक व त्याचा एक साथीदार वाहन सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांच्या मदतीने दोघांना पकडण्यात पोलिसांना यश  आले.  वाहनाची तपासणी केली असता त्यात जवळपास दोन लाख ५६ हजार ९२० रु पये किमतीचा दमणनिर्मित मद्यसाठा आढळून आला. ५ लाखांच्या वाहनासह ७ लाख ५६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल व संशयित संदेश आरीफभई लोहिया (३२, रा. नवसारी गुजरात) व मेहफूस समीर अन्सारी (२५, रा. सुरत) यांना अटक करण्यात आली. याबाबत पेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरसट, किरण बैरागी, सुनील तुंगार, खिरकडे, जव्हारी, डंबाळे, रेहरे आदी तपास करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी