शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालय क्षमतेच्या तुलनेत ५० टक्के परवानगी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:48 IST

नाशिक : राजकीय सभा, मेळावे, मुख्य बाजारपेठांमधील गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसताना केवळ विवाह सोहळ्यांना १०० नागरिकांच्या उपस्थितीची मर्यादा घालणे योग्य नाही. केवळ विवाहांमुळे कोरोना फैलावत नसल्याने पूर्वीप्रमाणे कार्यालय क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी मिळावी अशी मागणी जिल्हा केटरींग असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात साखळी उपोषणासह जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम गाढवे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्दे निर्बंध घटवा : विवाह सोहळ्यांबाबत निर्णय न झाल्यास उपोषणाचा केटरींग असोसिएशनचा इशारा

नाशिक : राजकीय सभा, मेळावे, मुख्य बाजारपेठांमधील गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसताना केवळ विवाह सोहळ्यांना १०० नागरिकांच्या उपस्थितीची मर्यादा घालणे योग्य नाही. केवळ विवाहांमुळे कोरोना फैलावत नसल्याने पूर्वीप्रमाणे कार्यालय क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची परवानगी मिळावी अशी मागणी जिल्हा केटरींग असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात साखळी उपोषणासह जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम गाढवे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.                                गत वर्षभर कोरोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे सर्व केटरींग व्यावसायिकांचे व्यवसाय कोलमडून पडू लागले आहेत. जिल्ह्यातील व्यावसायिकांचे सुमारे १५० कोटींचे नुकसान तसेच प्रत्येक लग्न तिथीला हजारो बेरोजगारांना मिळणारा रोजगार बुडत असून त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो नागरिकांच्या उपजिवीकेचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.

        अशा परिस्थितीत कोरोनाची दहशत काहीशी कमी होऊन परिस्थिती सुधारत असताना १०० नागरिकांच्या उपस्थितीचा निर्बंध अन्यायकारक आहे. कोणत्याही मंगल कार्यालय किंवा लॉन्स क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीच्या पूर्वीच्या नियमाला पुन्हा लागू करण्यात यावे, अशी आमची मागणी असल्याचे गाढवे यांनी नमूद केले. यावेळी पंकज पाटील, अनिल जोशी, अमर वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.अन्यथा जनहीत याचिकायेत्या १५ दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास जनहीत याचिका तसेच राज्यभरात संघटनेच्या वतीने साखळी उपोषणासह सर्व पर्यायांचा अवलंब करण्यात येईल, असा इशारा राहुल भावे यांनी दिला. तसेच विवाह समारंभात कुणी मास्क लावला नसेल, त्यालाच दंड करावा . त्यासाठी कार्यालय किंवा आयोजकांना दंड करणे अयोग्य असल्याचेही भावे यांनी नमूद केले.

टॅग्स :Socialसामाजिकcorona virusकोरोना वायरस बातम्या