शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पीक नियोजन कोलमडले

By admin | Updated: June 24, 2014 00:35 IST

सायगाव : येवला तालुक्याच्या दुष्काळ पाठ सोडायला तयार नसून, १९७२च्या दुष्काळापासून कमी-अधिक पर्जन्यमानावर, निसर्गाच्या लहरी-पणावर हिरवे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांची सतत घोर निराशाच झाली आहे.

सायगाव : येवला तालुक्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ पाठ सोडायला तयार नसून, १९७२च्या दुष्काळापासून कमी-अधिक पर्जन्यमानावर, निसर्गाच्या लहरी-पणावर हिरवे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांची सतत घोर निराशाच झाली आहे. अत्यल्प पावसामुळे कधी खरीप तर कधी रब्बी हंगामातील पिके करपली. यंदाही पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.गतवर्षाचे रोगट हवामान, बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने झोडपलेला शेतकरी कसाबसा सावरून नव्या खरीप हंगामाच्या तयारीला लागला. शेतीची सर्व मशागत आटोपून पाऊस पडला की लागवड करायची. हारलेला डाव पुन्हा खेळायचा ! पण रोहिणी, मृग नक्षत्रे संपली तरीही पाऊस नाही. हवामान खाते व पंचांग तसेच निसर्गातील अनेक ढोबळ संकेतानुसार पुढेही एक महिना पाऊस पडेल तर तो सरासरी किती पडेल, हेही निसर्गाच्याच स्वाधीन असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पीककर्ज काढून जमिनीची मशागत व बियाणे खरेदी करून बसलेला शेतकरी आज आभाळाकडे डोळे लावून आहे. खरीप हंगामासाठी रोहिणी, मृग व आर्द्रा ही तिन्ही नक्षत्रे योग्य असतात. या काळात पिकांची लागवड झाल्यास पिके शेवटपर्यंत तग धरतात. रोगाला बळी पडत नाही. उत्पादनही चांगले येते, परिणामी उत्पादन खर्चही कमी होतो. मात्र रोहिणी आणि मृग कोरडी गेली. आर्द्रा नक्षत्राच्या तोंडावर सोसाट्याचा वारा सुटल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे स्वप्न भंगण्याच्या मार्गावर आहे.उशिरा पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना कपाशी, मका, बाजरी आदि पिकांचे उत्पादन कमी मिळणार आहे. खरीप हंगामातील कांदा लागवडही लांबणार आहे. एकूणच शेती अर्थव्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम होणार आहे. पावसाळा लांबल्याने पीक लागवडीचे आराखडेही बदलणार आहे. कमी पाण्यावर व कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या लागवडीला अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकरी प्राधान्य देतात. मका पिकाचे लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.पावसाअभावी सर्वत्र बाजारपेठा ओस पडल्या आहे. ग्रामीण भागातील रोजगार थंडावल्यामुळे प्रत्येक जण हात आखडूनच काटकसर करत आहे. गेलेला पाऊस आषाढी एकादशीला येईल. ही आशा उरी बाळगून शेतकरीवर्ग पावसाची प्रतीक्षा करीत आहे. (वार्ताहर)