शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या उच्चाटनासाठी गावातच होणार रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:13 IST

आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव यांनी पाहणी करून ...

आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव यांनी पाहणी करून ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे कौतुक केले. बोरसे यांच्या सूचनेनंतर सोमपूर व जायखेडा येथे तात्काळ कोरोना उपचार केंद्र व विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

कोरोना रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन, बेड मिळत नाही. मात्र, याला अपवाद ठरवीत पिंपळकोठे येथील सरपंच किशोर भामरे, ग्रामसेवक योगेश भामरे व ग्रामस्थांनी ‘आपले गाव, आपली जबाबदारी’ या संकल्पनेतून संशयित रुग्णांना चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी गावालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत कोरोना उपचार सेंटर व विलगीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत व लोकसहभागातून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र २० खाटांचा कक्ष उभारला आहे. विशेष म्हणजे या रुग्णांना लागणारा औषधसाठा तयार केला असून, त्यासाठी औषध भांडारगृह तयार केले आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली गावातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. विलास भामरे, डॉ. पोपट झाल्टे पाटील, डॉ. कुणाल भामरे, डॉ. युवराज देवरे मोफत उपचार देणार आहेत. याठिकाणी पंख्याची व्यवस्था, प्रत्येक बेडला सलाइनची व्यवस्था, रुग्णांना स्वतंत्र शौचालयदेखील तयार करण्यात आले आहेत, तसेच मनोरंजनासाठी टीव्ही संच ठेवले आहेत.

गावपातळीवरील या उपक्रमाची आमदार बोरसे, तहसीलदार इंगळे, गटविकास अधिकारी कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी आहिरराव, डॉ. नंदन, विस्तार अधिकारी नितीन देशमुख, भय्यासाहेब सावंत आदी अधिकाऱ्यांनी शनिवारी भेट देऊन पाहणी केली.

कोट...

सरपंच म्हणून नाही, तर गावाचा ग्रामस्थ म्हणून मला अभिमान आहे. ग्रामस्थांबरोबर घेऊन कोरोना कक्ष सुरू केला. संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

-किशोर भामरे, सरपंच, पिंपळकोठे

फोटो कॅप्शन : १८ सटाणा ४

पिंपळकोठे येथे प्राथमिक शाळेत वीस खाटांच्या विलगीकरण कक्षाच्या उद्‌घाटनप्रसंगी आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव, सरपंच किशोर भामरे, संजीवनी संदन, नितीन देशमुख, भय्या सावंत आदी.

===Photopath===

180421\18nsk_32_18042021_13.jpg

===Caption===

पिंपळकोठे येथे प्राथमिक शाळेत वीस खाटांच्या विलगीकरण कक्षाच्या उदघाटनप्रसंगी आमदार दिलीप बोरसे, तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकारी पांडूरंग कोल्हे, तालूका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव, सरपंच किशोर भामरे, संजीवनी संदन, नितीन देशमुख, भैय्या सावंत आदी.