गर्भवती असतानाही रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 00:22 IST2021-05-16T00:22:07+5:302021-05-16T00:22:39+5:30

येवला : कोरोना काळात तालुक्यातील देवळाणे येथील आरोग्य उपकेंद्राच्या महिला कर्मचारी अमृता भुजाडे ह्या गर्भवती असतांनाही रजेवर न जाता ...

Patient care while pregnant | गर्भवती असतानाही रुग्णसेवा

गर्भवती असतानाही रुग्णसेवा

ठळक मुद्देअमृता भुजाडे यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान

येवला : कोरोना काळात तालुक्यातील देवळाणे येथील आरोग्य उपकेंद्राच्या महिला कर्मचारी अमृता भुजाडे ह्या गर्भवती असतांनाही रजेवर न जाता कोरोना कार्यात सक्रिय राहिल्या. त्याबद्दल त्यांचा बोकटे येथील कोरोना समितीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला.

भुजाडे यांनी बोकटे, देवळाणे, दुगलगाव परिसरात आरोग्य सेवा दिली. त्यांचा सन्मान करण्याचा प्रस्ताव सरपंच प्रताप दाभाडे यांनी समितीकडे मांडला होता.

ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, सरपंच प्रताप दाभाडे, ग्रामसेवक भावराव मोरे, तलाठी अश्विनी शेंडे, पोलीस पाटील सुरेश दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य अरुण मोरे, संतोष निकम, विलास दाभाडे, विजय दाभाडे, पोपट दाभाडे, अनिल मोरे, बाळासाहेब दाभाडे, सर्जेराब बागल, संदीप साळवे, बाळासाहेब मोरे, प्रसाद मुळे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Patient care while pregnant