शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाथरेकरांचा विरोध कायम

By admin | Updated: August 26, 2016 00:08 IST

समृद्धी महामार्ग : सायाळे व वावीकरांच्या अटी, शर्ती

सिन्नर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी महसूल, रस्ते व विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील पाथरे, सायाळे व वावी येथे शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. पाथरे येथील शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध करीत चर्चा करण्यास नकार देत बैठकीतून काढता पाय घेतला. सायाळे व वावी येथील शेतकऱ्यांनी भूसंचयन (लॅण्ड पुलिंग) न करता भूसंपादन करून एकरकमी मोबदला देण्याची मागणी करीत अनेक अटी व शर्ती मांडल्या. भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए. एस. खैरे, नाशिकचे कार्यकारी अभियंता चिंतामण धोत्रे, अहमदनगरचे कार्यकारी अभियंता प्रभाकर भोईर, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, लॅण्ड पुलिंग अधिकारी नामदेव जाधव यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाथरे, सायाळे व वावी येथे शेतकऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक बैठकीत उपजिल्हाधिकारी सोनवणे यांनी भूसंचयन (लॅण्ड पुलिंग) चा शासन निर्णय वाचून दाखविला. लॅण्ड पुलिंगमुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार आहेत, याची माहिती दिली. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादनाचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांचे जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत दहा बैठका घ्याव्या लागल्या तरी चालेल; मात्र एकतर्फी निर्णय घेतला जाणार नसल्याचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी वावी व सायाळे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितले. यापूर्वी उपग्रहाद्वारे सर्व्हे करण्यात आल्याने काही गटक्रमांक चुकले असतील; मात्र आता ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या मोजणीला सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. जमीन भूसंचयन करण्याबाबतचे बंधपत्र जिल्हाधिकारी करून देणार आहेत. त्यामुळे फसवणूक होणार नाही, विश्वास ठेवा असे आवाहन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. भूसंचयन न करता भूसंपादन करून शेतकऱ्यांना एकरकमी मोबदला द्या, अशी मागणी सायाळे व वावी येथील बैठकीत शेतकऱ्यांनी केली. दोन लाख रुपये प्रतिगुंठा दराने जमिनीला भाव द्या, प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकरी द्या, नोडमध्ये विकसित जमीन द्या, अशा अटी व शर्ती शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या. दुशिंगपूर येथील बंधाऱ्यासाठी यापूर्वी मोठी जमीन संपादित करण्यात आली आहे. सदर महामार्ग या बंधाऱ्यातून जात असल्याचे दिसते असे रामनाथ ढमाले यांनी सांगितले. शासन एकीकडे जलसमृद्धीसाठी योजना राबवित असताना या महामार्गासाठी सदर बंधारा बुजवणार का, असा संतप्त सवाल ढमाले यांनी उपस्थित केला. यावेळी अरुण भरीतकर, इलाहीबक्ष शेख, अ‍ॅड. प्रमोद ढमाले यांच्यासह शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडून प्रश्न उपस्थित केले. वावी येथील बैठकीस संपत पठाडे, विठ्ठल उगले, मंदार केसकर, संतोष जोशी, बाबा कांदळकर, विजय गुरुळे, पवन भेंडाळे, चांगदेव ढमाले, नवनाथ घेगडमल, ज्ञानेश्वर लोंढे यांच्यासह दुशिंगपूर, कहांडवाडी, वावी व फुलेनगर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायाळे येथील बैठकीत शेतकऱ्यांनी भूसंचयन न करता भूसंपादन करा पण एकरकमी मोबदला द्या, अशी मागणी केली. यावेळी सरपंच पंडित चासकर, सुधाकर शिंदे, तुकाराम शिंदे, मलढोणचे शिवाजी हालवर, जगन शेंडगे, मच्छिंद्र शिंदे, तानाजी शिंदे यांच्यासह सायाळे व मलढोण येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)