शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

पाप्या शेखने हल्लेखोरांना ओळखले

By admin | Updated: November 22, 2014 00:20 IST

न्यायालयात आरोपींची हजेरी : जिल्हा व सत्र न्यायालयात समर्थकांची प्रचंड गर्दी

नाशिक : शिंदे-पळसेजवळील हॉटेल किरणमध्ये सराईत गुन्हेगार पाप्या शेख व त्याच्या साथीदारांवर झालेल्या गोळीबारात शेखच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ हा गोळीबार व खून खटला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असून, शुक्रवारी पाप्या शेखने रिव्हॉल्व्हर, हत्त्यारे व कपड्यांबरोबरच संशयितांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे़ सी़ शिरसाळे यांच्यासमोर ओळखले़
पाप्याची न्यायालयात साक्ष व उलटतपासणी पूर्ण झाली असून, येत्या २७ नोव्हेंबरला या गोळीबारात जखमी झालेल्या त्याच्या दोन साथीदारांची साक्ष होणार आहे़ दरम्यान, आज जिल्हा न्यायालयात दोन्ही बाजूच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती़
या घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, सराईत गुन्हेगार पाप्या शेख पत्नी ललिता, मुलगा गणेश व साथीदार विनोद सुभाष जाधव, सुनील ज्ञानदेव लहारे यांच्यासमवेत ७ मार्च २०११ रोजी कल्याणहून शिर्डीकडे जात होता़ त्यावेळी शिंदे-पळसेजवळील हॉटेल किरण येथे तीन-चार दुचाकीवर आलेल्या दहा-बारा जणांनी गोळीबार केला़ यामध्ये पाप्याचा मुलगा सात-आठ वर्षांचा मुलगा गणेशचा गोळी लागून मृत्यू झाला, तर विनोद जाधवला गोळी लागली होती़
पाप्यावरही पाच-सहा गोळ्या झाडून हल्लेखोरांनी पुन्हा सत्तू व धारदार शस्त्राने वारही केले होते़ पाप्याच्या भावाने इतरांच्या मदतीने या सर्वांना प्रथम बिटको व नंतर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते़
शुक्रवारी न्यायालयात पाप्याची साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली़ पाप्याने न्यायाधीशांसमोर हल्लेखोर प्रदीप सरोदे, संजय धामणे, अजय शेख, शाहरूख शेख, सागर अशोक बेग यांना ओळखले; मात्र पोलिसांनी प्रमुख आरोपी केलेला नितीन शेजवळ हा घटनेच्या वेळी नसल्याचे सांगून क्लिन चिट दिली़ याबरोबरच हल्ल्यात वापरण्यात आलेले चार रिव्हॉल्व्हर, सत्तूर, चाकू, हल्ल्यावेळचे स्वत:चे व मुलाचे कपडेही ओळखले़ २७ नोव्हेंबरला या हल्ल्यात जखमी झालेले पाप्याचे साथीदार विनोद जाधव, सुनील लहारे यांची साक्ष होणार आहे़ या दोघांपैकी एक येरवडा, तर दुसरा नाशिकरोड कारागृहात आहे़ या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ सुधीर कोतवाल, तर आरोपींतर्फे अ‍ॅड़ पवार व अ‍ॅड़ वाणी काम पाहत आहेत़ (प्रतिनिधी)