बिबट्याच्या संचारामुळे दहशत

By Admin | Updated: September 26, 2016 23:15 IST2016-09-26T23:15:03+5:302016-09-26T23:15:59+5:30

छावणी पंपिंग स्टेशन : तीन दिवसांपासून परिसरात वास्तव्य

Panic attacks cause panic | बिबट्याच्या संचारामुळे दहशत

बिबट्याच्या संचारामुळे दहशत

पांढुर्ली : देवळाली कॅम्प परिसरातील दारणा काठावर कॅन्टोन्मेंट छावणीचे पंपिंग स्टेशन परिसरात आठवडाभरापासून बिबट्याचा संचार सुरू आहे. वनविभागाने याबाबत लक्ष देऊन तत्काळ पिंजरे लावून मोकळ्या बिबट्याला जेरबंद करावे.
येथील शेतकरी व नागरिकांमध्ये बिबट्याचा संचाराने दहशत पसरली आहे. पंपिंग स्टेशनवर काम करणारे कामगार भयभीत झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोन बिबटे पंपिंगसमोरील रस्त्यावर असलेल्या साईबाबा मंदिरजवळ दिसल्याचे शेतकरी व पंपिंगवर काम करणारे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या सर्व घटनेची माहिती कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांना दिली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. बुधवारी (दि. २१) रोजी वनविभागाला पिंजरा लावण्याबाबत पत्रदेखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे व कामगारांचे म्हणणे आहे.
भगूर-पांढुर्ली रस्त्यावर सांयकाळी ६ वाजेच्या दरम्यान उसाच्या शेतात बिबट्या उभा
असल्याचे अनेक ग्रामस्थांना दिसला आहे. (वार्ताहर)

Web Title: Panic attacks cause panic