शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूरवाडीत जलसंधारण कामाचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:59 IST

सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील आशापूर (टेंभूरवाडी) येथे युवामित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियानांतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला.

ठळक मुद्देजलसाक्षरता अभियान । लोकसहभागातून गाळाची वाहतूक

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील आशापूर (टेंभूरवाडी) येथे युवामित्र संस्थेमार्फत जलसाक्षरता अभियानांतर्गत विकास आराखडा तयार करण्यात आला.युवामित्र संस्थेचे सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सिन्नर तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जय हनुमान पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव व संचालक यांच्या माध्यमातून गावातील जलसंधारणाच्या कामाचा विकास आराखडा तयार करण्यात आला. पाणी व्यवस्थापन, जबाबदारी, जास्तीत जास्त सभासद बनविणे तसेच गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंध करून कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेऊन दरडोई उत्पन्नात कशी भर पाडता येईल व गावातील भूजल पातळीत कशी वाढ करता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेत युवामित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवामित्र संस्थेच्या जलसमृद्धी प्रकल्पाअंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, प्रकल्प समन्वयक मंगेश बोपचे यांच्या मार्गदर्शनाने प्रीतम लोणारे यांनी गावात असलेल्या जलस्रोतांमधील गाळ काढण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. त्यामध्ये युवामित्र, टाटा ट्रस्ट व एटीई चंद्रा फाउण्डेशनमार्फत पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. महाराष्ट्र शासनामार्फत मशीनसाठी लागणारे इंधन देण्यात येईल तसेच बंधाऱ्यातील निघणाºया गाळाची वाहतूक ही लोकसहभागातून करायची असे यावेळी त्यांनी सांगितले. पाणीवापर संस्था सचिव रंगनाथ पाटोळे यांनी मागील दोन वर्षांपासून धनगरी पाझर तलावामध्ये केलेल्या कामांबाबद्दल युवामित्र संस्थेचे आभार व्यक्त केले. यावेळी युवामित्र संस्थेचे क्षेत्र सोमनाथ वाघ, रामदास पालवे, पांडुरंग पाटोळे, रंगनाथ पाटोळे, विष्णू पाटोळे, अशोक पाटोळे, शिवाजी पाटोळे, भाऊसाहेब पाटोळे, दत्तू पाटोळे, जयवंत पालवे, पुंजा पाटोळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी