शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक शांतता परिषदेचे आयोजन

By admin | Updated: October 23, 2016 00:05 IST

एसएमआरके महाविद्यालय : राज्यपालांच्या हस्ते होणार उद्घाटन

नाशिक : दहशतवादाचा फटका संपूर्ण जगाला बसत असताना शिक्षणातून शांतता प्रस्थापित करण्यासाठी इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पिस (आयएईडब्ल्यूपी) आणि गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक शांतता परिषदे’चे एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे.सोमवार (दि. २४) ते बुधवार (दि. २६) या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असल्याची माहिती शनिवारी (दि. २२) महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. ‘सुशासन आणि अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ या संकल्पनेवर ही परिषद आधारित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या परिषदेत भारतासह अमेरिका, तैवान, नागालॅण्ड आदि ठिकाणाहून येणाऱ्या तज्ज्ञांद्वारे मांडण्यात येणाऱ्या विचारांतून विश्वशांतीच्या प्रयत्नांना बळ मिळेल, असा विश्वास यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांनी पत्रकार परिषदे दरम्यान व्यक्त केला.संयुक्त राष्ट्रांचा वर्धापन दिन, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची १५१ वी जयंती, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवपूर्व २५ महिन्यांच्या कालखंडाचा शुभारंभ आणि ‘डॉ. एम. एस. गोसावी एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान सोहळा अशा घटनांचे औचित्य साधून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सुशासन आणि अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ या परिषदेच्या अध्यक्ष स्थानी अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेवर, परिषदेचे विशेष अतिथी राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री गिरीश महाजन आणि खासदार चिंतामण वनगा हेदेखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, डॉ. विवेक बोबडे, प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, प्रा. छाया लोखंडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)