शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश वाडकरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश

By admin | Updated: June 25, 2014 14:09 IST

भागीदारीत घेतलेल्या जमिनीचा नंतरच्या काळात भागीदाराला डावलून परस्पर व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक : भागीदारीत घेतलेल्या जमिनीचा नंतरच्या काळात भागीदाराला डावलून परस्पर व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर व त्यांच्या दोघा साथीदारांविरुद्ध चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हेमंत बापूराव कोठीकर यांनी याबाबत न्यायदंडाधिकारी श्रीमती जयश्री पुनावाल यांच्यासमक्ष अ‍ॅडव्होकेट मंदार भानोसे यांच्यामार्फत हा दावा दाखल केला आहे. १६ एप्रिल २००८ मध्ये तक्रारदार हेमंत कोठीकर, गायक सुरेश वाडकर, व सोनू आगमकुमार निगम या तिघांनी देवळाली शिवारातील सर्व्हे नंबर ७/१३ येथील ७७ आर जमीन खरेदी करण्यासाठी जमीन मालक राजेश प्रभाकर दरगोडे व अजित प्रभाकर दरगोडे यांच्याशी खरेदीपूर्व साठेखत करारनामा करून व्यवहार निश्चित केला व त्यापोटी दरगोडेंना तिघांनी मोठ्या रकमाही अदा केल्या. त्यानंतर मात्र या जमिनीच्या व्यवहारात बरीच गुंतागुंत असल्याचे निदर्शनास आल्याने व्यवहारातील उर्वरित रक्कम गुंतागुंत मिटवून दिल्यानंतरच देण्यात येईल याची जाणीव दरगोडे यांना करून देण्यात आली, परंतु दरगोडे त्याची पूर्तता करू शकले नाहीत म्हणून दिवाणी न्यायालयात स्पेसिफिक परफार्मन्सचा दावा खरेदीदार तिघांनीही दाखल केला व सध्या तो न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही सुरेश वाडकर यांनी सदर जमिनीचे मूळ मालक विनायक धोपावकर व विजया करंदीकर या दोघांना हाताशी धरून ७ फेब्रुवारी २०१३ रोजी वादात सापडलेली मिळकत स्वत:च्या नावे लिहून घेतली, असे तक्रारदार कोठीकर यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे मिळकतीचा करारनामा लिहून घेऊन सुरेश वाडकर, विनायक धोपावकर व विजया करंदीकर यांनी आपली फसवणूक करून आर्थिक नुकसान केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी विनंती कोठीकर यांनी न्यायालयाला केली होती. त्यावर सुनावणी न्यायालयाने वाडकरांसह तिघांविरुद्ध कलम १५६ (३) सी.आर.पी.सी. अन्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून सविस्तर तपास करावा, असे आदेश दिले आहेत.