शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

नीटचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 19:14 IST

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) अनेक विद्यार्थ्यांकडून विविध तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एनटीएने नीटसाठीऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत संधी उपलब्ध करून दिली आहे

ठळक मुद्देनीट परीक्षा अर्जाचा दुसरा, तीसरा,चौथा भाग भरता येणारपरीक्षा शुल्क भरण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत संधी

नाशिक :वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची व अर्जात ऑनलाइन दुरुस्ती करण्याची मुदत संपल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी तसेच परीक्षा अर्जाचा भाग दोन, तीन आणि चार भरण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.  नीटसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत राबविण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना ६ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी ७ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांच्या आॅनलाइन अर्जातील दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) अनेक विद्यार्थ्यांकडून विविध तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एनटीएने नीटसाठीऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत संधी उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्जाच्या दुसऱ्या भागातील संपूर्ण माहिती भरण्यासह तिसºया भागात आवश्यक स्कॅन केलेल्या कागदपत्रांच्या प्रती व चौथ्या भागात परीक्षा शुल्कासहऑनलाइन अर्ज भरल्याची पोचपावती या माहितीसह विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, एनटीएने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुदतवाढ व अतिरिक्त संधी उपलब्ध क रून दिली असली तरी नीट परीक्षा ही पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ३ मे रोजीच होणार आहे. त्यासाठी हॉलतिकीट २७ मार्चपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असल्याची माहिती एनटीएतर्फे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.   

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थीexamपरीक्षा