शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची उघडीप; ‘आॅक्टोबर हीट’ची चाहूल

By admin | Updated: September 15, 2014 18:05 IST

पावसाची उघडीप; ‘आॅक्टोबर हीट’ची चाहूल

 

नाशिक : गेल्या चार दिवसांपासून शहर परिसरात पावसाने उघडीप दिली असून, शहरवासीयांना आता आॅक्टोबर हीटची चाहूल लागू लागली आहे. यंदा पहिल्या दीड महिन्यात पावसाने शहराकडे पाठ फिरवल्याने शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचीदेखील पातळी खालावल्याने पाणीपुरवठ्यावर गंडांतर आले होते. अखेर महापालिकेवर पाणीकपात करण्याची वेळ आली होती. काही दिवस शहरात एकवेळच पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांचे हाल झाले होते; मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात पर्जन्यवृष्टीला प्रारंभ झाला. सुमारे तीन ते चार दिवस शहरात पावसाची संततधार सुरू होती. परिणामी, गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन नाशिककर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. दरम्यान, त्यानंतरही पावसाने विश्रांती न घेता शहरात हजेरी सुरूच ठेवली. आॅगस्ट महिन्यात शहरात पहिला नैसर्गिक पूर आला. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने सप्टेंबर महिन्यातही तीनदा शहराला पुराने तडाखा दिला. गंगापूर धरणातून हजारो क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदाकाठावरील घरे, टपऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. मात्र बुधवारपासून पावसाने उघडीप दिली असून, शहरात कडक ऊन जाणवू लागले आहे. पावसामुळे रस्त्यावरील माती मोकळी झाली असून, पाऊस थांबल्यानंतर आता वाहनांच्या येण्या-जाण्यामुळे ही माती हवेत पसरत आहे. त्यामुळे रस्ते धुलिकामय होत आहे. दरम्यान, आॅक्टोबर महिन्यात थंडीच्या आधी उन्हाची काहिली वाढते. याला ‘आॅक्टोबर हीट’ असे म्हटले जाते. त्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून, दुपारी वातावरणातील उकाड्यातील वाढ जाणवू लागली आहे. (प्रतिनिधी)