नाशकात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 02:08 PM2020-04-13T14:08:08+5:302020-04-13T14:10:40+5:30

राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमधील प्राध्यापकांनी डिजिटल लर्निंगचा आराखडा तयार केला असून गुगल क्लास रूम, व्हाट्सएप, झूम अ‍ॅप ,पॉवर पॉईंट प्रेसेंटशन सारख्या विविध माध्यमांचा वापर करून मार्चनंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

Online Education for Technicolor Students in Nashik | नाशकात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण

नाशकात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण

Next
ठळक मुद्देतंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईऩ धडेप्राध्यापकांनी ऑनलाईन दिले 103 लेक्चर नियोजनासाठी मविप्रच्या 37 ऑनलाईन बैठका

नाशिक :  कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात मोठे संकट उभे राहिले असून त्याचा फटका सर्वच क्षेत्राला बसत आहे. राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनच्या शिक्षकांनी या परिस्थितीला तोंड देत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला असून त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळातही विद्यार्थ्यांची शैक्षणिक नूकसान टाळणे शक्य झाल्याने पालक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या या उपक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे. 
मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमधील शिक्षकांनी प्राचार्य डॉ.डी. बी उफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल लर्निंगचा आराखडा तयार केला असून प्राध्यापकांनी गुगल क्लास रूम, व्हाट्सएप, झूम अ‍ॅप ,पॉवर पॉईंट प्रेसेंटशन सारख्या विविध माध्यमांचा वापर करून मार्चनंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापकांनी  त्यांच्या वैयक्तीक ब्लॉगवरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला असून  याद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नोट्स व अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन असाईनमेंट करून घेण्यात आल्या असून त्या जमा करण्यासाठी गुगल क्लास रूम चा वापर करण्यात येत आहे. महाविद्यालयातील दैनंदिन कामकाजचा आढावा तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी. बी. उफाडे झूमअ‍ॅप च्या माध्यमातून रोज स्टाफमीटिंग घेऊन घेत आहेत. आता पर्यंत एकूण १०३ आॅनलाईन तासिकांसह ३२ बैठका  घेण्यात आल्याची माहिती तंत्रनिकेतनचे प्राध्यापक अजीत पाटील यांनी दिली.  

Web Title: Online Education for Technicolor Students in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.