शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा गडगडला

By admin | Updated: September 8, 2016 00:45 IST

येवला : शेतकरी हवालदिल

येवला : सलग तीन दिवस येवला बाजार समितीत कांदा लिलाव सुटीमुळे बंद होते. बुधवारी कांदा मार्केट खुले झाले. उन्हाळ कांद्याची दहा हजार क्विंटल आवक झाली तर अंदरसूल मार्केटला तीन हजार क्विंटल कांदा आला. दोन्ही मार्केटला कांद्याच्या भावात बुधवारी १२५ रुपयाने कांदा गडगडला. त्यामुळे ग्राहक वर्गाला ४ रु पये ते ६ रु पये प्रतिकिलो भाव मिळत असला तरी शेतकरी मात्र आगीतून उठून फुफाट्यात पडला आहे.येवला मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली असून, कांद्याचे बाजारभाव केवळ किमान १५० रुपये ते ६२३ तर सरासरी ४२५ रुपये क्विंटल भाव होते. अंदरसूल मार्केट यार्डवर कांद्याची आवक दोन हजार क्विंटल झाली. भाव किमान २०० ते ६४६ पर्यंत तर सरासरी ४०० रुपये क्विंटल होते. कांद्याच्या भावात निरंतर घसरण चालू आहे. राज्यासह देशांतर्गत व परदेशात स्थानिक पातळीवर कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे कांदा भावात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रासायनिक खते, बी-बियाणे, शेती औजारे व मजुरीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च ८०० रुपये प्रतिक्विंटल झाला. एप्रिलमध्ये साठवलेला कांदा गेल्या चार महिन्यात ६० टक्के घटल्याने आता उरलेल्या ४० टक्के कांद्याला केवळ १२५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी संतापला आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? शेतकऱ्यांचे नुकसानच करायचे का, असा संतप्त सवाल शेतकरी बाजार आवारात विचारीत होते. कांदा उत्पादनासाठी आलेला खर्च, विविध संस्थाकडून तसेच बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, याची चिंता कांदा उत्पादकांना सध्या सतावत आहे. (वार्ताहर)