शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भावात घसरण; मक्याचे भाव वाढले

By admin | Updated: April 30, 2017 01:32 IST

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून असून, बाजारभावात मात्र घसरण सुरुच असल्याचे दिसून आले.

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून असून, बाजारभावात मात्र घसरण सुरुच असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत व परदेशात सर्वसाधारण मागणी होती. सप्ताहात एकुण कांदा आवक ४०३१२ क्विंटल झाली उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु . २०० ते ५८० सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होते. उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक १३५४६ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान रु . १५० कमाल ५५५ तर सरासरी ४०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत होते. सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली. बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहील्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकुण आवक १७४ क्विंटल झाली बाजारभाव किमान रु . १५५०कमाल १७७९ तर सरासरी १६८१ रुयांपर्यंत होते. सप्ताहात बाजरीच्या आवकेत घट झाली . बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले.बाजरीची एकुण आवक ५० क्विंटल झाली. भाव किमान रु . १२९६ कमाल रु १४५१ तर सरासरी १३४१ रुपयांपर्यंत होते. हरभऱ्याची आवक टिकून होती तर बाजारभाव तेजीत असल्याचे दिसुन आले. हरबऱ्यास व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने भाव तेजीत होते. हरभऱ्याची एकुण आवक ८९ क्विंटल झाली . भाव किमान ५४०१ कमाल ९१०० तर सरासरी ७१९१ रुपयांपर्यंत होते.तुरीच्या आवकेत घट झाली तर भाव स्थिर असल्याचे दिसुन आले. तुरीस व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहील्याने भाव स्थिर होते. तुरीची एकुण आवक ३७ क्विंटल झाली. भाव किमान रु .३५०० कमाल ३९०९ तर सरासरी३७८५ रुपयांपर्यंत होते. सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली. बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सोयाबीनला व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण असल्यामुळे बाजारभाव स्थिर होते. सोयाबीनची एकुण आवक ५६ क्विंटल झाली. भाव किमान रु . २७४४ , कमाल २८३४ तर सरासरी २८०१ रुपयांपर्यंत होते.