शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूलावर अपघातात एक ठार तर दोघांचा दुचाकीवरून पडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 19:21 IST

या अपघातात एक प्रवाशी जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएक प्रवाशी जागीच ठार तर चौघे गंभीर जखमीदुचाकीवरून पडून महिला ठार

नाशिक : भरधाव चारचाकी उड्डानपुलावरील दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात १ ठार तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूलावरून मुंबईकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणारी कार दूभाजकावर आदळून अपघात घडला. या अपघातात एक प्रवाशी जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.याबाबत अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास पाथर्डीफाट्याजवळ उड्डाणपूलावर हा अपघात घडला. देवंद्र प्रतापसिंग भानुप्रतापसिंग (३१, रा. आदिलनगर, लखनऊ) या युवकाचा अपघातात मृत्यू झाला. तसेच जितेंद्रसिंग, सरिता चव्हाण, राखीसिंग व आयुष सिंग हे चौघे गंभीर जखमी आहेत. हे सर्व प्रवाशी लखनऊ येथून नाशिककडे येत असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास पाथर्डीफाटा येथील उड्डाणपुलावर त्यांची भरधाव इनोव्हा कार (यु.पी.३२, एमएम २०५०) चालविणाऱ्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला जाऊन धडकली. जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना भानुप्रताप यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषीत केले. तर जखमी चौघांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.दुचाकीस्वाराचा मृत्यूदुचाकी अपघातात जखमी झालेल्या सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मच्छिंद्र भीामराव पवार (३४, रा. नायगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.२९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पवार यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा असताना त्यांचा मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.दुचाकीवरून पडून महिला ठारदुचाकीवरून प्रवास करताना एक वृद्ध महिला तोल जाऊन जव्हार रस्त्यावर अंबोली फाट्याजवळ कोसळली. या अपघातात जैनाबाई सखाराम शेवरे (६०, रा. आमलोण, ता. पेठ) या सोमवारी दिपावलीनिमित्त मुलगा पुनाजी शेवरे याच्या दुचाकीवर पाठीमागे बसून जव्हारच्या दिशेने प्रवास करत होत्या. अंबोली फाटा येथे खड्डयात दुचाकी आदळल्याने जैनाबाई यांचा तोल गेल्याने त्या रस्त्यावर पडल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. जैनाबाई यांना त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकिय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात