वडनेरभैरव येथे वसुंधरा संवर्धनासाठी शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST2020-12-04T04:39:51+5:302020-12-04T04:39:51+5:30

गावपातळीवर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रशासक सुनील पाटील, ग्रामविकास अधिकारी रोशन सूर्यवंशी यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. ...

Oath for planet conservation at Wadnerbhairav | वडनेरभैरव येथे वसुंधरा संवर्धनासाठी शपथ

वडनेरभैरव येथे वसुंधरा संवर्धनासाठी शपथ

गावपातळीवर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रशासक सुनील पाटील, ग्रामविकास अधिकारी रोशन सूर्यवंशी यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. त्यासंबंधी सर्व विभागनिहाय नियोजन करून गावात विहीर पुनर्भरण, वैयक्तिक शोषखड्डे, नॅडेप कंपोस्ट युनिट, कचरा संकलन, वृक्षलागवड, रस्ते हरितीकरण, स्मृती उद्यान, जनजागृती , प्लॅस्टिकबंदी ,सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर नियोजन केले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती निमित्ताने शपथ व वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविक रोशन सूर्यवंशी यांनी, तर सूत्रसंचालन किरण जाधव यांनी केले. आभार विजय पवार यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शोभा कडाळे, पंचायत समिती सदस्य अमोल भालेराव, संपतबाबा वक्टे, ग्रामपंचायत सदस्य नुरजहान पठाण, मीनाताई हिंगे, एकात्मिक बालविकास प्रकल्प, मुख्यसेविका जाधव, प्रकाश बागुल, केशव जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो- ०३ एमएमजी १

Web Title: Oath for planet conservation at Wadnerbhairav