शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रमाबाई आंबेडकर वसतीगृहाचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 18:02 IST

नाशिक : नेहरू उद्यानसमोरील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थीनी वसतीगृह हा ऐतिहासिक वारसा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वास्तुचा ...

ठळक मुद्देपाच कोटींचा निधी : शासनाकडून निधीला मंजुरी

नाशिक: नेहरू उद्यानसमोरील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थीनी वसतीगृह हा ऐतिहासिक वारसा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वास्तुचा भूमीपूजन सोहळा झालेला आहे. त्यामुळे या वस्तुचे जतन व्हावे यासाठी शासनाने या वास्तुच्या नुतणीकरणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली. या कामाच्या लवकरच निविदा निघणार असल्याचेही फरांदे यांनी यावेळी सांगितले.शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नेहरू उद्यानासमोरच विद्यार्थीनी वसतीगृह असून या वसतीगृहाच्या माध्यमातून समाजातील मुलींना सन्माने निवास आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. अनेक मुली या वसतीगृहातून घडलेल्या आहेत. गेली अनेक वर्ष ही वास्तू तशीच असून विद्यार्थीनींची संख्या मात्र वाढत गेली आहे. त्यामुळे वसतीगृह अपुरे देखील पडत होते. सोयीसुविधा पुरविण्यासही अनेक अडचणी येत असल्यामुळे या वसतीगृहाच्या नुतणीकरणाची नेहमीच मागणी केली जात होती. त्यामुळे तातडीने प्रस्ताव करून तो शासनाकडे पाठविण्यात आला आणि पाठपुरावा करून वसतीगृहाच्या नुतणीकरणासाठी शासनाकडून पाच कोटी मंजूर झाले असे फरांदे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी वसतीगृहाच्या अध्यक्ष सुमन कर्डक, कॅप्टन कुणाल वाघ, माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक सुषमा पगारे, पी.के. गायकवाड, सुहास फरांदे, रमेश गायकवाड, अभय गायकवाड, सुधीर गायकवाड, सुमन गायकवाड, बेबी डेर्ले, संजय गायकवाड, आदि उपस्थित होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले वसतीगृह आणि या वास्तुचे भूमीपूजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे ही एक ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे शासनाच्या अनुसूचित जात आणि नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृट्या महत्वाच्या असणाऱ्या स्थळांचा विकास करण्याच्या धोरणातून वसतीगृहाचे नुतणीकरण होणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र