शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

एनएसडीच्या नभांगणातही चमकणार ‘हंडाभर चांदण्या’

By admin | Updated: October 25, 2016 01:28 IST

महोत्सवासाठी निवड : फेब्रुवारीत दिल्लीत प्रयोग

नाशिक : दुष्काळाच्या दाहकतेवर टोकदार भाष्य करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या रंगभूमीवर सध्या गाजत असलेल्या नाशिकच्या ‘हंडाभर चांदण्या’ या प्रायोगिक नाटकाची दखल थेट राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात एनएसडीने घेतली असून, फेबु्रवारी २०१७ मध्ये दिल्लीत होणाऱ्या भारत रंग महोत्सवासाठी निवड केली आहे. देश-विदेशांतील ६९ नाटकांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव प्रायोगिक नाटकाचा महोत्सवात समावेश आहे. नाटकाचे निर्माते व सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत आनंदवार्ता दिली. यावेळी नाटकाचे लेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांच्यासह नाटकातील सर्व कलावंत उपस्थित होते. यावेळी गायकवाड यांनी सांगितले, एक वर्षापूर्वी ‘हंडाभर चांदण्या’ हे प्रायोगिक नाटक रंगभूमीवर आले. संस्थेने आजवर केलेल्या १६ प्रयोगांच्या माध्यमातून जमा झालेला निधी महाराष्ट्रातील दुष्काळी व आदिवासी भागातील गावांसाठी जलाभियनाकरिता दिला आहे. या अभियानांतर्गत पाच गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही उत्स्फूर्तपणे गौरविले जात असलेल्या ‘हंडाभर चांदण्या’ची दखल आता दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने घेतलेली आहे. एनएसडीमार्फत दि. १ ते २१ फेबु्रवारी २०१७ दरम्यान आशिया खंडातील सर्वांत मोठा नाट्योत्सव भरवला जाणार असून, त्यात ५ फेब्रुवारीला ‘हंडाभर चांदण्या’चा प्रयोग होणार आहे. प्रश्नांचे बिऱ्हाड पाठीवर घेत जगणं सहज करून घेणाऱ्या ग्रामीण भागातील हुंकार आता देशातील राजधानीत उमटणार असून, नाशिकच्या रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रायोगिक नाटकाला दिल्ली दरबारी स्थान मिळाले असल्याचे लेखक दत्ता पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)