शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आता पर्यायी शाहीमार्गालाही विरोध

By admin | Updated: January 8, 2015 00:42 IST

ग्रामउत्सव समिती : बैठक त्वरित बोलावण्याची केली मागणी

नाशिक : कुंभमेळ्यातील शाहीमार्गासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आता गणेशवाडीतील पर्यायी शाहीमार्गाचा स्वीकार करण्याची तयारी सुरू आहे. तथापि, दुसरीकडे मात्र या चर्चेमुळे पंचवटीकरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे सिंहस्थ ग्रामउत्सव समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात तातडीने प्रशासनाने बैठक बोलवावी आणि त्यात ग्रामउत्सव समितीला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.गेल्या तीन कुंभमेळ्यापासून पंचवटीकरांनी सिंहस्थ ग्रामोदय समितीची स्थापना केली आहे. या समितीत पंचवटीतील सामजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विद्यमान खासदार या समितीचे अध्यक्ष असतात. त्या निकषाने सध्या खासदार हेमंत गोडसे हे अध्यक्ष आहेत. पंचवटी हे कुंभमेळ्याचे मूळ स्थान आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी सेवाभावी वृत्तीने सामिल होऊन कार्यरत राहावे असे समितीचे धोरण आहे. परंतु शासन आणि प्रशासनाने तर महाउत्सवात पंचवटीकरांचा सहभागच नष्ट केला आहे. आता पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या उत्सवाच्या पद्धतीलाही बदलण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. शाही मिरवणुकीच्या मार्गातील बदल हा त्यातीलच एक भाग असल्याचे समितीने म्हटले आहे. पारंपरिक शाहीमार्गावर मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात गेलेला भाविकांचा बळी ही दुर्दैवी बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी म्हणजेच शाहीमार्गात केलेले बदल बघता प्रशासनाने आपले अपयश मान्य केल्यासारखेच असल्याचे समितीचे म्हणणे आहे. परंतु पारंपरिक शाहीमार्गावर काही प्रमुख धार्मिक स्थळे, पौराणिक मंदिरे व साधू-महंतांचे आखाडे आहेत. त्यामुळे या मार्गाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. साधू-महंतांच्या व समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक वर्षापूर्वी चर्चा झाली. त्यावेळी शाही मिरवणुकीचा मार्ग, शाहीस्नानाचे स्थान व कुंभमेळ्याच्या जागा यात कोणत्याही प्रकारे बदल केला जाणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे कोणत्याही प्रशासकीय कामांमध्ये समितीने कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही, असे नमूद करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मात्र शाहीमार्गामध्ये बदल करण्याचे नियोजन प्रशासन करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पंचवटीकरांमध्ये अस्वस्थता व विरोध होत आहे. त्याकरिता प्रशासनाने कोणत्याही निर्णयाच्या अंतिम टप्प्यात जाण्याआधी समितीशी संवाद साधणे गरजेचे आहे. यासंबंधात समितीची बैठक पुढील सप्ताहात बोलावण्यात आली असून, त्यावेळी पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे कार्याध्यक्ष भगवान भोगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)