शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेचे खळ्ळखट्याक

By admin | Updated: September 14, 2015 22:52 IST

राज ठाकरे : शरद जोशींची भेट घेऊन चर्चा करणार

नाशिक : राज्यात दुष्काळाच्या प्रश्नावर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच मनसेनेही आता या विषयावर उडी घेण्याची तयारी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजगड येथे शेतकऱ्यांशी चर्चा करून मनसेच्या स्टाइलने खळ्ळखट्याक करण्याचे संकेत दिले आहे. ग्रामीण प्रश्नावर प्रथमच स्वारस्य दाखविणाऱ्या राज यांनी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही जाहीर केले आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सध्या विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, राष्ट्रवादीने जेलभरो आंदोलन सुरू केले आहेत. त्यातून सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात संघर्ष वाढत असतानाच मनसेनेही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढण्याची तयारी केली आहे. राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पक्ष कार्यालयात शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी शेतकऱ्यांनी सध्याच्या दुष्काळापासून ते हमी भाव मिळण्यापर्यंतचे विविध मुद्दे मांडले. चर्चेच्या दरम्यान राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांनाच अनेक प्रश्न विचारले. शेतकरी हे आंदोलन करताना वेगळ्या भूमिकेत असतात आणि सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी दुसऱ्या पक्षीय भूमिकेत असतात, अशी दुटप्पी भूमिका का घेतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित प्रतिनिधींना केला. शेतकरी आजवर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिले, मात्र त्यांना काय मिळाले. शरद पवार हे आता दुष्काळाचे दौरे करीत आहेत, मग इतके वर्ष सत्तेत असताना त्यांनी काय केले, महाराष्ट्रात पंधरा वर्षे सत्ता असताना राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसने शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्प किंवा काही अन्य प्रकल्प राबविले असते तर आज दुष्काळाची परिस्थिती उद््भवली नसती, असे सांगून राज यांनी मराठवाड्यातील परिस्थितीबाबत याच पक्षांना जबाबदार ठरविले. एकीकडे मराठवाड्यात पाणी नाही. मग, तेथे बडे राजकीय नेते उसाची शेती करून साखर कारखाने का चालवीत आहेत. इतके वर्षे मते दिलेल्या या राजकीय पक्षाला जाब का विचारत नाहीत, असा प्रश्न करून मराठवाड्याला आत्ताच वाळवंट होण्यापासून रोखले नाही, तर भविष्यात येथील वाळवंट हटविण्यासाठी पावणे दोनशे वर्षे लागतील, असेही ते म्हणाले.मनसेचे आंदोलन हे निर्णय घेणारे असते, त्यामुळे आधी जे प्रश्न मांडले त्याची उत्तरे तुम्हीच द्या, निर्णय हाती असल्याशिवाय मी आंदोलन करीत नाही असे सांगून त्यांनी पुन्हा २४ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये बैठक घेण्यात येईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी प्रश्नांची उत्तरे शोधून ठेवावीत, असेही सांगितले.या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गोविंद पगार, दीपक पगार, हंसराज वडघुले याचबरोबर मनसेचे रतन कुमार इचम, शेखर पवार, दिनकर जाधव अशा अनेकांनी मते मांडली. सर्वच राजकीय पक्षांकडून भ्रमनिरास झाल्याने आता मनसेकडून अपेक्षा आहेत, मनसेने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करावे, ग्रामीण भागापर्यंत पक्ष संघटना बांधावी, नारपार आणि मांजरपाडासारखे प्रश्न सुटावे यासाठी पाणी परिषद घ्यावी, अशा प्रश्नांबरोबरच पालकमंत्री गिरीश महाजन यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नसल्याच्या तक्रारी केल्या. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष राहुल ढिकले, डॉ. प्रदीप पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.स्वाभिमानीही मानणार राज यांचे नेतृत्व

राज्यात सत्तारूढ पक्षाबरोबर असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकऱ्यांनी या बैठकीस हजेरी लावताना राज यांचे नेतृत्व मान्य करण्याची तयारी दर्शविली. इतकेच नव्हे तर स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून आपण त्यांना राज ठाकरे यांच्या आंदोलनात साथ देण्यासाठी गळ घालण्याची तयारी दर्शवली.