शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

एसटी ‘पास’ देण्याची सूचना

By admin | Updated: July 2, 2015 00:10 IST

कुंभमेळा : ‘हरित बस’चे लोकार्पण

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना तिकीट काढण्याचा त्रास होऊ नये, याकरिता त्यांच्यासाठी पास योजना राबविण्याची सूचना राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आयोजित परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक कॅप्टन विनोद रत्नपारखी, मुख्य स्थापत्य अभियंता जे. बी. इनामदार, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोडे, प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड, विभाग नियंत्रक यामिनी जोशी आदि उपस्थित होते. पर्वणीकाळात सुमारे ५० लाख भाविकांची महामंडळाच्या बसेसद्वारे वाहतूक होणार असल्याने त्या सर्वांना बसचे तिकीट देण्यात जाणारा वेळ पाहता त्यांना ठरावीक रकमेच्या पासचे वितरण केल्यास त्यांची वाहतूक सुरळीत होऊ शकेल आणि वेळही वाचेल. त्यामुळे प्रत्येक बाह्य वाहनतळाच्या ठिकाणी भाविकांना पासेस मिळतील, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना रावते यांनी केल्या. यासाठी २०, ५० आणि १०० रुपयांच्या पासचे वितरण करण्याची सूचना त्यांनी केली. रावते म्हणाले, कुंभमेळा कालावधीत बाहेरून येणारी सर्व वाहने ही नाशिक शहराबाहेर थांबविली जाणार असून, शहरात भाविक एसटीने येणार आहेत. पर्वणी काळात भाविकांना तिकिटाऐवजी विशिष्ट रक्कम आकारून पास देण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)