शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

राकेश कोष्टीसह नऊ गुंडांवर तडीपारीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:20 IST

पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत टोळी तयार करून विविध प्रकारचे शरीराविरुद्धच्या गुन्हेगारी कारवाया करणारा टोळीप्रमुख राकेश तुकाराम कोष्टी (२६, रा. दत्त चौक, सिडको) याच्यासह त्याच्या टोळीतील नऊ सराईत गुंडांना शहरासह जिल्ह्यातून उपआयुक्त अमोल तांबे यांनी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश सोमवारी (दि.११) दिले.

नाशिक : पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत टोळी तयार करून विविध प्रकारचे शरीराविरुद्धच्या गुन्हेगारी कारवाया करणारा टोळीप्रमुख राकेश तुकाराम कोष्टी (२६, रा. दत्त चौक, सिडको) याच्यासह त्याच्या टोळीतील नऊ सराईत गुंडांना शहरासह जिल्ह्यातून उपआयुक्त अमोल तांबे यांनी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश सोमवारी (दि.११) दिले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातत्याने पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या कोष्टीच्या टोळीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. यामध्ये कोष्टीसह जयेश ऊर्फ जया हिरामण दिवे (२५, रा. इंद्रकुं ड), आकाश विलास जाधव (१९, रा. मखमलाबाद नाका), मयूर ऊर्फ मुन्ना शिवराम कानडे (२३, रा. मेहरधाम) यांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहेत. तसेच त्यांचे साथीदार अजय दिलीप बागुल (२९, रा. मोरे मळा, रामवाडी), किरण दिनेश नागरे (३०, रा. जाणता राजा कॉलनी) या दोघा गुंडांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.शहरातील संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्तांनी तयार केलेल्या अ‍ॅक्शन प्लॅननुसार गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरु करण्यात आले आहे. सध्या संवेदनशील परिस्थिती असल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांकडून तडीपार गुंडांची माहिती घेतली जात आहे.महाराष्टÑ पोलीस कायदा कलम ५६ अन्वये बबी ऊर्फ प्रताप अशोकबना खाकोडिया (१९, रा. गणेशवाडी) यास १ वर्षासाठी तर राहुल उत्तम शिंदे (१९, रा. भराडवाडी, फुलेनगर), किरण दत्तात्रय शेळके (२६, रा. महावीरनगर) या सराईत गुंडांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या गुन्हेगारांविरुद्ध शरीरासह मालाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीस प्रतिबंध घालण्यासाठी त्यांच्या तडीपार प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन तांबे यांनी आयुक्तालय हद्दीसह जिल्ह्यातून तडीपार केले आहे. अद्याप परिमंडळ-१मधून ९२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस