शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात पुन्हा महागणार घरे

By admin | Updated: December 17, 2014 00:24 IST

रेडिरेकनरची दरवाढ : सर्वसामान्यांना भुर्दंड; क्रेडाईचे पदाधिकारी आज खडसे यांना भेटणार

नाशिक : गेल्यावर्षी रेडिरेकनर म्हणजेच जमिनीच्या सरकारी बाजार भावात झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना घर खरेदी आवाक्याबाहेर गेली, मात्र त्यात सुधारणा होण्याऐवजी पुन्हा एकदा नागरिकांना घरखरेदीसाठी आणखी भुर्दंड मोजावा लागणार आहे. येत्या १ जानेवारीपासून रेडिरेकनरमध्ये कमीत कमी वीस टक्के दरवाढ होण्याचे संकेत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकही धास्तावले असून, ही दरवाढ रोखण्यासाठी क्रेडाईचे पदाधिकारी महसूलमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तातडीने नागपूर येथे बुधवारी रवाना होत आहेत. चालू वर्षी १ जानेवारीपासून रेडिरेकनरची जी दरवाढ झाली. त्यावेळी जमीन खरेदी आणि विक्री महाग झाली. त्यावेळी ज्या भाजपाने नाशिकमध्ये रेडिरेकनरची होळी केली त्याच भाजपाची सत्ता आल्यानंतर ही दरवाढ रद्द तर झाली नाहीच, उलट आता दरवाढ करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले असून, अच्छे दिन नेमके कोणाचे असा प्रश्न घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना पडला आहे.नाशिक शहरातील जमिनींचे सरकारी दर जानेवारी महिन्यात तब्बल चाळीस टक्क््यांनी वाढविण्यात आले. काही पट्ट्यात ही वाढ तब्बल शंभर टक्के अधिक होती. तर फुटनोटमधील काही अजब तरतुदींचा विचार केला तर ही दरवाढ तब्बल दीडशे टक्क््यांची वाढ होत होती. बांधकाम व्यावसायिकांनी फुट नोटच्या अंमलबजावणीस स्थगिती आणली असली तरी आजमितीला अशा कायदेशीर तिढ्यामुळे तब्बल एक हजार सदनिका पडून असल्याचे क्रेडाईच्या सर्वेत निदर्शनास आले आहे. चालू वर्षी नागरिकांना दरवाढीमुळे घर खरेदी करता आली नव्हती. त्यामुळे आता तरी नवीन वर्षात घरांचे दर आटोक्यात राहतील अशी असलेली अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे. नव्या वर्षातही रेडिरेकनरच्या दरात कमीत कमी वीस टक्के दरवाढ होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पुन्हा एकदा महागणार आहे. सदर प्रकाराचा अंदाज आल्यानंतर क्रेडाईने तातडीने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेण्याची तयारी केली असून, त्यानुसार सुरेश पाटील, राजीव ठक्कर, सुनील कोतवाल हे नागपूरला बुधवारी पोहोचणार आहे. या दरवाढी संदर्भात नाशिकमधील भाजपाचे आमदार आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)