माजी विद्यार्थ्यांनी उभारले शाळेस नवीन प्रवेशद्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 05:29 PM2021-01-21T17:29:47+5:302021-01-21T17:30:46+5:30

इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने पैसे जमाकरुन शाळेस नवीन प्रवेशद्वार उभारले.

New entrance to the school built by alumni | माजी विद्यार्थ्यांनी उभारले शाळेस नवीन प्रवेशद्वार

शाळेचे नूतन प्रवेशद्वार.

Next
ठळक मुद्देमहात्मा गांधी हायस्कूलच्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने राबविला उपक्रम

इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने पैसे जमाकरुन शाळेस नवीन प्रवेशद्वार उभारले.
                         याप्रसंगी प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्याच्या निमित्ताने स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांच्या हस्ते या नविन प्रवेशद्वाराचे उद‌्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष अशोक नावंदर, नाशिक रुंगठा हायस्कुलचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड, प्राचार्य रेखा हिरे, मुख्याध्यापक राजाराम आहिरे, मुख्याध्यापक शांता तुसे, प्राचार्य नितीन वामन, क्रीडाशिक्षक हेमंत देशपांडे, माजी शिक्षक आर. यु. अहिरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दुलीचंद कुमावत आदी उपस्थित होते.
             या कार्यक्रमास नाशिक, पुणे, नागपूर, राजस्थान, कोटा, मुंबई, इगतपुरी आदी ठिकाणाहून सुमारे ३० ते ३५ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. सर्व एकत्र आल्याने जुन्या गोष्टींना उजाळा देत केलेल्या कामाबद्दल उपस्त्रततांनी कौतुकाची थाप दिली.
याप्रसंगी संदीप चांदवडकर, पंकज पाटील, प्रितेश संचेती, प्रशांत कडू, दीपक आहेर, सदानंद आडोळे, अमोल दुधे, प्रशांत शिंदे, वैभव गायकवाड, सुमित अनारे, हर्षद सोनवणे, योगेश पाटील, पराग मांडे, वसंत डावखर, उत्तम दुभाषे, रशीद सय्यद, कुणाल क्षिरसागर, किशोर मोरे, रोहन कुलथे, मुकेश कुमावत, संतोष सरकाळे, मनीष नागरे, योगेंद्र शर्मा, गणेश पवार, महेश पुरोहित, सचिन शर्मा, संजय ढोन्नर, निलेश पवार,भाऊसाहेब शिंदे, राज सरगर, गणेश घाटकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश कुलकर्णी, अनिशा कुलकर्णी, कैलास गुजराथी, तुषार साळुंखे, पुष्पलता सुर्वे, प्रदीप रहाटे, प्रसाद चौधरी, संजय पवार, विजय सोनवणे, किरण फलटणकर आदींनी परीश्रम घेतले.


 

Web Title: New entrance to the school built by alumni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.