शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उपकेंद्रासाठी नव्या सरकारचा नवा अध्याय

By admin | Updated: June 23, 2015 01:42 IST

उपकेंद्रासाठी नव्या सरकारचा नवा अध्याय

  नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राला १३ आॅगस्ट २०१३ रोजी आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘नाशिक कॅम्पस’ म्हणून मान्यता दिली गेली. सरकारच्या या घोषणेनंतर लगेचच कुलगुरू डॉ. वासुदेव गाढे यांनी नाशिक गाठून विद्यार्थी संघटनांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत आनंदोत्सव साजरा केला. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण भाजपा सरकारने उपकेंद्रासाठीची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करण्याची तयारी सुरू केली असून, याकरिता समिती गठीत केली आहे. अहमदनगर व नाशिक येथे पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात आला होता. त्यानुसार अहमदनगर येथे उपकेंद्र उभारले गेले. मात्र नाशिकच्या उपकेंद्रासाठीच्या जागेचा प्रश्न सुटता सुटत नव्हता. अखेर शिवनई गाव येथे शासनाने ६३ एकर जागा मंजूर करून विद्यापीठाला हस्तांतरित केली. शिवाय १३५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. मात्र, नव्या भाजपा सरकारने उपकेंद्राबाबत अघाडी सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयाला स्थगिती देत नव्याने प्रक्रिया करण्याचे धोरण अवलंबविले आहे. त्यामुळे उपकेंद्राची नाशिकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच शिवनई गाव येथील ६३ एकर जागेपैकी १३ एकर जागा अतिक्रमित झाल्याने केवळ ४० एकर जागेवरच उपकेंद्र उभारावे लागणार आहे. वास्तविक जिल्'ात ८५ कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची महाविद्यालये आहेत. ५५ अभियांत्रिकी, ३३ एमबीए, २८ बीडी फार्म, ११ एम फार्म, सहा एमसीए, पाच विधी, तीन स्थापत्य, १२ संशोधन केंद्र आदि महाविद्यालये विद्यापीठाअंतर्गत येतात. कळवण तालुक्यातून विद्यार्थ्यास पुणे विद्यापीठास जायचे झाल्यास ११ तासांचा प्रवास करावा लागतो. ही बाब इतर विद्यार्थ्यांबाबतही लागू होत असल्याने जिल्'ात उपकेंद्र होणे जिकरीचे आहे; परंतु राजकीय अनास्थेमुळे शैक्षणिक क्षेत्रात जिल्'ाचा विकास खुंटत असल्याचा विद्यार्थ्यांमध्ये सूर उमटत आहे.