शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सध्याची जीवनशैली बदलण्याची गरज

By admin | Updated: September 29, 2016 00:25 IST

हृदयविकाराबाबत जागृती : नियमित दक्षता घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

स्वप्निल जोशी  नाशिकबदलत्या जीवनशैलीमुळे तसेच पाश्चात्य संस्कृतीचे करण्यात येणारे अनुकरण यामुळे हृदयविकार दिवसेंदिवस बळावत चालला आहे. पूर्वी चाळीस वर्षांनंतर येणारा हृदयविकाराचा झटका आता युवापिढीत म्हणजे तिशीच्या आतील युवकांनाही येत असल्याचे आढळत आहे. हृदयविकाराला दूर ठेवायचे असल्यास आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.बदलत्या जीवनशैली बरोबरच शारीरिक श्रमात घट, त्या तुलनेत वाढणारे ताण-तणाव आणि व्यसनाधिनतेचे वाढते प्रमाण यामुळे हृदयविकारदेखील वाढू लागले आहेत. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये रक्तातील साखरेची तपासणी, रक्तदाब तपासणी, अतिरिक्त कोलेस्ट्रॉल (चरबी), वजन आदिंची तपासणी करणेदेखील महत्त्वाचे आहे, असे हृदयरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.हृदयविकार शस्त्रक्रियेत कार्डियाक स्टेण्ट या वैद्यकीय उपकरणाची महत्त्वाची भूमिका आहे. या स्टेण्टची आयात करावी लागत असल्याने याच्या देशभरात विविध ठिकाणी भिन्न किमती आढळून येतात. हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेचा खर्च सामान्य रुग्णाला परवडत नाही, ही बाब खरी असली तरी स्टेण्ट या वैद्यकीय उपकरणाचे औषध मूल्य नियंत्रण सूचीत ‘अत्यावश्यक औषधां’मध्ये समावेश करण्याची शिफारस अन्न आणि औषध प्रशासन विभाग यांनी राष्ट्रीय औषधनिर्माण मूल्य प्राधिकरणाकडे केली आहे. या निर्णयाबाबत दिल्ली येथे शुक्रवारी (दि. ३०) बैठक अपेक्षित असून रविवारी (दि. २) यावर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.शस्त्रक्रिया पद्धतीत सुधारणा होणे आवश्यकराज्य शासनाच्या वतीने हृदयविकार शस्त्रक्रिये-साठी सवलत देण्यात येत असली तरी बदलत्या तंत्रज्ञानानुसार या शस्त्रक्रिया पद्धतीत सुधारणा होणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या पथ्यांचे पालन करणे आवश्यक आहे. आहार-विहार-औषधे- शारीरिक श्रम या चतु:सूत्रीचा दैनंदिन आयुष्यात उपयोग होणे आवश्यक आहे. तरच हृदयविकारापासून दूर राहता येते.- डॉ. मनोज चोपडा,हृदयरोग तज्ज्ञ