शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग माहिती केंद्र उरले शोभेपुरतेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:21 IST

नाशिक : येथील त्र्यंबक रोडवरील पश्चिम वन विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच २००३ साली सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त साकारण्यात आलेले ‘निसर्ग माहिती केंद्र’ सध्या धूळखात पडून आहे. या केंद्राची पूर्णत: रया गेली असून, देखभाल, दुरुस्तीअभावी या वास्तूची दुर्दशा होऊन अवकळा आली आहे. हे माहिती केंद्र मागील काही वर्षांपासून कुलूपबंदच असल्याने केवळ शोभेपुरतेच उरले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औचित्याने २००३ साली वन विभाग कार्यालयाच्या आवारात निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात आले होते.

ठळक मुद्देनिधीही मिळेना अन‌् कोणी लक्षही देईना

नाशिक : येथील त्र्यंबक रोडवरील पश्चिम वन विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच २००३ साली सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त साकारण्यात आलेले ह्यनिसर्ग माहिती केंद्रह्ण सध्या धूळखात पडून आहे. या केंद्राची पूर्णत: रया गेली असून, देखभाल, दुरुस्तीअभावी या वास्तूची दुर्दशा होऊन अवकळा आली आहे. हे माहिती केंद्र मागील काही वर्षांपासून कुलूपबंदच असल्याने केवळ शोभेपुरतेच उरले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औचित्याने २००३ साली वन विभाग कार्यालयाच्या आवारात निसर्ग माहिती केंद्र उभारण्यात आले होते.कुंभमेळ्याच्यानिमित्ताने शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविक, पर्यटकांना नाशिक जिल्ह्याची जैवविविधता आणि निसर्गाची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश होता. नव्याचे नऊ दिवसांपुरते या केंद्राचे अस्तित्व टिकून राहिले; मात्र काळानुरूप येथील केंद्राचे तीनतेरा वाजले. २०१५ साली झालेल्या कुंभमेळ्यातसुद्धा या केंद्राला लागलेले दुरवस्थेचे ग्रहण दुर्दैवाने सुटू शकले नाही. कुंभमेळा होऊन पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटला असून, अद्यापही या केंद्राची अवकळा दूर करण्याकरिता संबंधित विभागाकडून कुठलेही प्रयत्न होत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये निसर्गप्रेम वाढणार तरी कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.लोकोपयोगी विविध विकासकामांवर लाखो ते कोट्यवधी रुपयांचा खर्च शासनाकडून होत असताना जिल्हा प्रशासन किंवा वन विभागाने हे माहिती केंद्र पुन्हा नव्याने अस्तित्वात आणण्याकरिता प्रयत्न केल्याचे अजून तरी दिसून येत नाही. शहरात निसर्गाचा परिचय करून देणारे एकही केंद्र सध्या अस्तित्वात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे केंद्र उभारण्यात आलेले असताना केवळ देखभाल, दुरुस्तीअभावी पश्चिम वन विभागीय कार्यालयातील माहिती केंद्राला अवकळा प्राप्त झाली, हे विशेष!निधीही मिळेना अन‌् कोणी लक्षही देईना२००३ साली उभारण्यात आलेल्या हे निसर्ग माहिती केंद्र पुन्हा नव्याने सुरू करण्याकरिता भल्या मोठ्या निधीची आवश्यकता भासणार आहे, असे नाही; मात्र मागील आठ ते दहा वर्षांमध्ये या केंद्राला आलेली अवकळा दूर करण्याकरिता कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. पश्चिम वन विभागीय कार्यालयातून नाशिक जिल्ह्याच्या आठ ते नऊ वनपरिक्षेत्रांचे नियंत्रण केले जाते; मात्र याच कार्यालयाच्या आवारात असलेली ही लोकोपयोगी वास्तू दुर्लक्षित राहिल्याने संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिक