शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय क्र ीडा विद्यापीठाच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम

By admin | Updated: August 26, 2016 22:08 IST

राष्ट्रीय क्र ीडा विद्यापीठाच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम

येवला : अध्यापक भारतीच्या उपक्रमात क्र ीडापटूंसह संघटना, प्रशिक्षकांचा सहभाग येवला : अध्यापक भारतीच्या ‘क्र ीडा शिक्षण हक्क अभियान’अंतर्गत सोमवारी (दि. २९) राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ व क्रीडा विद्यालय स्थापनेच्या मागणीसाठी नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यापक भारतीतर्फे सह्यांची मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडापटू, क्र ीडा मंडळे व संघटना, क्रीडाशिक्षक-प्रशिक्षक क्रीडाप्रेमींना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध खेळ व क्रीडा प्रकार मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून, खेळाद्वारे राष्ट्रीय अस्मिता व देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आणि जिल्हा व तालुकास्तरावर क्रीडा विद्यालय स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी अध्यापक भारतीकडून व्यापकस्वरूपात सह्याचे अभियान राबविण्यात येत आहे. या मागणीस अधिक गती देऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय क्रीडादिनी (दि.२९) सकाळी १० वा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय/ राज्य क्रीडा विद्यापीठाची स्थापना व क्रीडा विद्यालयासाठी जनजागृती करण्यासाठी अध्यापक भारतीच्या वतीने राष्ट्रीय क्रीडादिनी क्र ीडा  शिक्षण हक्क अभियानअंतर्गत सह्याची मोहीम राबविली जाणार आहे. मोहिमेत नाशिक शहर व जिल्ह्यातीलक्र ीडा मंडळे, क्रीडा संस्था, संघटना, व्यक्ती, खेळाडू, क्र ीडाप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन शरद शेजवळ व समाधान पगारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.क्रीडा शिक्षण हक्क अभियानातील ठळक मागण्या पुढीलप्रमाणे- केंद्र सरकारने राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ व राज्य सरकारने राज्य क्र ीडा विद्यापीठ स्थापन करावे व नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर तालुका व जिल्हा स्तरावर निवासी क्रीडा विद्यालये व महाविद्यालये स्थापन करावीत.अभियानाच्या यशस्वीतेसाठी विनोद पानसरे, अजय जाधव, अमिन शेख, गौतम हिरे, अखिल गांगुर्डे, मयूर सोनवणे, प्रियंका केवट, खालील सय्यद, अभय लोखंडे, प्रवीण कर्डक, सागर पगारे, देवशिंग खरे, प्रबुद्ध थोरात, सचिन बागुल, सुनील वाघ, विशाल बर्वे, ईश्वर गांगुर्डे, स्वप्नील गाढे-पाटील,पिंकू बागुल, सुनील मोंडे, संदीप चक्रनारायण प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)