शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे मराठी साहित्य  संमेलन अखेर लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 01:50 IST

नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा औरंगाबाद येथे केली. संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले असले, तरी कोरोनाचा प्रसार कमी होताच त्यापुढील २० दिवसांत संमेलन घेण्याची तयारी असल्याचे साहित्य संमेलन पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.  

ठळक मुद्देकोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे निर्णय

नाशिक / औरंगाबाद : नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा औरंगाबाद येथे केली. संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले असले, तरी कोरोनाचा प्रसार कमी होताच त्यापुढील २० दिवसांत संमेलन घेण्याची तयारी असल्याचे साहित्य संमेलन पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.  कोरोनाच्या आपत्तीवर नियंत्रण नसल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे कोरोना ओसरल्यावर स्वागत मंडळाला साहित्य महामंडळाशी चर्चा करून संमेलन कधी घ्यायचे, त्याबाबत निर्णय घेता येईल, असे ठाले-पाटील यांनी नमूद केले. संमेलन तात्पुरते रद्द करताना शासन तसेच सर्व घटकांचा विचार करूनच निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे तर, नाशिकसाठीच्या संमेलनाची पूर्वतयारी जोरात सुरू असतानाच सर्वांच्या सुरक्षिततेकरिता हा निर्णय घ्यावा लागला, असे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी सांगितले. ...तर मे महिन्यात संमेलनस्थगित संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष आणि सर्व निमंत्रित साहित्यिक यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असेही ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले आहे तसेच कोरोना आटोक्यात आल्यानंतर, मे, २०२१ पर्यंत नाशिकला संमेलन घेण्याची अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.  विद्रोही साहित्य संमेलनही रद्द  नाशिकमध्ये केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात २५ व २६ मार्चला आयोजित करण्यात आलेले १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनदेखील रद्द करण्यात आले आहे. ज्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल, त्याच दिवसांमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णयदेखील रविवारी (दि.७) बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक