शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणातून उभी राहणार घरकुल योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 17:20 IST

नाशिक : शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल योजना राबविली जाते.तथापी योजना राबवितांना पुरेशी शासकीय जमीन उपलब्ध होत नसल्याने अनेक ...

ठळक मुद्दे२५ हजार कुटूंबाना लाभ : नव्या वर्षात होणार गृहप्रवेश

नाशिक: शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल योजना राबविली जाते.तथापी योजना राबवितांना पुरेशी शासकीय जमीन उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येतात. जागेअभावी संबंधित लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेली घरे अधिकृत करण्यात करण्याची कारवाई सुरू असून नाशिक जिल्ह्यात सुमारे २५ हजार कुटूंबांना याचा लाभ होणार आहे.ग्रामीण भागात शासकीय जमिनीवर निवासासाठी करण्यात आलेली अतिक्रमणे नियतिम करण्याच्या धोरणांतर्गत जिल्ह्यातील अतिक्र मणांची नोंद घेण्यात आली असून जिल्हयात ४९२ ग्रामपंचायतीमध्ये जवळपास २४,६०० नोंदी झाल्या आहेत. यावर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणुन ग्रामपंचायत स्तरावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अशाप्रकारची २५,४३४ अतिक्रमणे आहेत. संगणकीय प्रणालीवर अतिक्र मणधारकांच्या नोंदीबाबत ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतच्या हरकती नोंदविल्या आहेत. जिल्हयात जवळपास २४,६०० नोंदी झाल्या असून, यावर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठळक, दर्शनी भागात अतिक्र मणधारकांची यादी लावण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत.या योजनेतंतर्गत जवळपास ९३ टक्के काम पुर्ण झाले असून २५ हजाराच्या जवळपास अतिक्रमणांचा मुद्या निकाली निघालेला आहे. यामुळे संबंधितांना दिलासा मिळाला असून शासनाची योजनाही या माध्यमातून पुर्णत्वास येणार आहे. ज्या जमिनींवर अतिक्रमणे आहेत आणि मोठा जनसमुदाय असेल अशी ही घरे असल्यामुळे त्यांचा विचार करून अतिक्रमण नियमित करण्याबाबतचे धोरण शासनाने घेतले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद