शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याविरूद्ध कर्मचारी संघटनांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 19:25 IST

नाशिक : वीज ग्राहकाला मोबाईल क्रमांक दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यास धाऊन जाणाºया भद्रकाली उपविभागाच्या सहायक अभियंत्याविरुद्ध कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्यावतीने ...

ठळक मुद्देमहावितरण : भद्रकाली कक्षातील प्रकार; निलंबनाची मागणी

नाशिक: वीज ग्राहकाला मोबाईल क्रमांक दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यास धाऊन जाणाºया भद्रकाली उपविभागाच्या सहायक अभियंत्याविरुद्ध कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी संबधित अभियंत्यावर निलंबनाची कारवार्ई करण्याची मागणी केली.या संदर्भात कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भद्रकाली कक्ष ३ शहर उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांने कर्तव्यावर असलेले कर्मचारी दिलीप काशिनाथ भोये यांना मोबाईल नंबर ग्राहकाला दिल्याच्या कारणावरून हेल्मेट घेऊन अंगावर धाऊन आल्याचे म्हटले आहे. या घटनेच्या निषेधार्थ संयुक्त कृती समितीच्यावतीने भद्रकाली शहर उपविभाग कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वर्कर्स फेडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, मागासवर्गीय संघटना, इलेक्तिट्रक लाईन स्टाफ संघटना या कामगार संघटनांनी आंदोलन पुकारले होते.यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता जनवीर यांना तक्र ारीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दिलीप काशिनाथ भोये, तंत्रज्ञ हे दुसºया पाळीत ड्युटीवर असतांना कापड बाजारातील वीज पुरवठा खंडीत केलेले एक ग्राहक भरलेले वीज बील घेऊन आले. वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली अशावेळी रिकनेक्शन चार्जेस भरल्याशिवाय वीज पुरवठा पूर्ववत करता येणार नाही असे त्यांना सांगण्यात आले.सदर बाब संबंधित अभियंत्यांस समजल्यानंतर त्यांनी भोये यांना जाब विचारु न शिविगाळ केली व सोमवार पासून तुमच्याकडे बघतो असा दम भरला. एवढ्यावरच न थांबता हेल्मेट मारु न फेकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही भोये यांनी केला आहे. सदर बाब कामगार संघटना पदाधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन घोषणाबाजी केली.यावेळी सहाय्यक अभियंता पेंढारकर यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली. तसेच त्वरीत निलंबन झाले पाहिजे, , आदी मागण्यांचे निवेदन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता यांना दिले.

 

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण