शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना वाढत्या उन्हाचा चटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:37 IST

हंगामातील उच्चांकी कमाल तपमानाची नोंद सोमवारी (दि.२६) शहरात झाली. ३८.१ अंश इतके कमाल तर किमान तपमान १६.६ नोंदविले गेले. या उन्हाळ्यातील सर्वांत उच्चांकी तपमान ठरल्याची माहिती हवामान निरीक्षण केंद्राने दिली. पारा वाढल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे.

नाशिक : हंगामातील उच्चांकी कमाल तपमानाची नोंद सोमवारी (दि.२६) शहरात झाली. ३८.१ अंश इतके कमाल तर किमान तपमान १६.६ नोंदविले गेले. या उन्हाळ्यातील सर्वांत उच्चांकी तपमान ठरल्याची माहिती हवामान निरीक्षण केंद्राने दिली. पारा वाढल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. मागील तीन दिवसांपासून शहराचे कमाल तपमान वाढत असून, सोमवारी पारा थेट ३८ अंशांपर्यंत सरकल्याने नाशिककरांच्या अंगाची काहिली झाली. दुपारी १पासून ते ४ वाजेपर्यंत नाशिककरांना उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला. रविवारी कमाल तपमानाचा पारा ३७ अंशांपुढे सरकला होता; मात्र किमान तपमान कमी असल्याने वातावरणात उष्मा जाणवत नव्हता व सूर्यास्त होताच उष्ण वातावरण तितक्याच वेगाने थंड होत होते. रात्री काही भागात थंड वाराही सुटल्याचे नागरिकांनी अनुभवले; मात्र सोमवारी कमाल व किमान तपमानात वाढ झाल्याने वाऱ्याचा वेग मंदावला व वातावरणात उष्माही जाणवत होता. त्यामुळे रात्रीही नागरिकांना उकाडा सहन करावा लागला. मार्चअखेर कमाल तपमानाचा पारा ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत उष्ण वातावरण वाढणार असून नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस बाहेर पडणे टाळावे. गरज असल्यास बाहेर पडताना उन्हापासून बचावाची योग्य ती खबरदारी घ्यावी. घरातून निघताना भरपूर पाणी पिऊन बाहेर पडावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पुढील काही दिवसांमध्ये कमाल तपमानाबरोबर किमान तपमानही १८ अंशांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. तसेच वातावरणातील आर्द्रताही वाढू शकते, यामुळे नाशिककरांना उकाडा व घामाचा त्रास अधिक सहन करावा लागण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हामुळे उष्मा वाढत असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.शीतपेयांसह टोप्या, स्टोलला मागणीवाढत्या उन्हामुळे नागरिकांकडून शीतपेयांद्वारे उष्णतेपासून अंगाची होणारी काहिली थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबरोबर उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी टोप्या, स्टोल, सनकोट, गॉगल्सला मागणी वाढत आहे. यामुळे या वस्तूंच्याही किमतींमध्ये वाढ झाली असून, विक्रेत्यांकडून कुठल्याही प्रकारे किमतीमध्ये तडजोड न करता भावावर ठाम राहून वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच शहरातील विविध रस्त्यांवर उसाच्या रसाचे गुºहाळ, लिंबू सरबत, मसाला ताक, अननस, संत्री, मोसंबी ज्यूस विक्रीची दुकाने थाटली असून, दुकानांवर गर्दी होऊ लागल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Temperatureतापमान