शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड कारागृहात अधिकाऱ्यास मारहाण

By admin | Updated: December 26, 2016 02:53 IST

असुरक्षितता कायम : आणखी दोन मोबाइल सापडले

 नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बिघडलेली शिस्त व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच कैद्यांकडून मोबाइल सापडण्यापाठोपाठ तुरुंग अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटनाही घडून लागल्या आहेत़ मोक्कातील एका आरोपीने तुरुंग अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, कारागृहातून आणखी दोन मोबाइल जप्त करण्यात आले कारागृह की ‘मोबाइल शॉपी’ असा प्रश्न निर्माण झाला आहे़नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकारी प्रदीपकुमार ज्ञानदेव बाबर हे शनिवारी दुपारी कारागृहात तपासणी करीत होते़ दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास मंडल कार्यालयासमोर मोक्का तसेच जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा झालेला कैदी वेन्सिल रॉय मिरिंडा उर्फ मॉन्टी (कैदी नंबर ९९८६) याच्याकडे मोबाइल आढळून आला़ त्याच्याकडील मोबाइल जप्तीची कारवाई सुरू असतानाच त्याने बाबर यांच्या अंगावर धाऊन मारहाण केली़ यामध्ये बाबर जखमी झाले असून, त्यांनी या प्रकरणीपोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़  मध्यवर्ती कारागृहातील सुरू असलेल्या झडतीत कैदी संजय रणधीर पवार (रा़ जुने, नाशिक) हा प्लास्टिकच्या बकेटमध्ये मोबाइल लपवून जात असताना तुरुंग अधिकारी संतोष कारथोरे यांनी पकडले़ त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ कारागृहातील कैद्यांकडे सापडत असलेल्या मोबाइल प्रकरणातून तीन वरिष्ठ तुरुंग अधिकारी कैलास भवर, गणेश मानकर, सुनीलकुमार कुवर यांना निलंबितही करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)