नाशिककरांना यंदा हवे ५६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:17 AM2021-09-06T04:17:30+5:302021-09-06T04:17:30+5:30

नाशिक शहराला सध्या दोन धरण समूहातून पाणीपुरवठा केला जातो. त्यात गंगापूर धरण ९१ टक्के भरलेले असले तरी कश्यपी आणि ...

Nashik residents want 5600 million cubic feet of water reservation this year | नाशिककरांना यंदा हवे ५६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण

नाशिककरांना यंदा हवे ५६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण

Next

नाशिक शहराला सध्या दोन धरण समूहातून पाणीपुरवठा केला जातो. त्यात गंगापूर धरण ९१ टक्के भरलेले असले तरी कश्यपी आणि गौतमी गोदावरी मिळून गंगापूर धरण समूहाचा विचार केला तर हे धरण ८४ टक्के इतकेच भरले आहे. दारणा धरण देखील ९१ टक्के भरले आहे तर मुकणे धरण ५८ टक्के इतके भरले आहे. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर २०२० ते ३१ जुलै २०२१ या कालावधीसाठी महापालिकेेने ५५०० दशलक्ष घनफूट आरक्षण मागणी नोंदवली होती. यात

गंगापूर धरण समूहातून ३८०० दशलक्ष घनफूट, दारणा धरणातून ४०० दशलक्ष घनफूट तर मुकणे धरणातून १३०० दशलक्ष घनफूट अशाप्रकारे एकूण ५५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी होती. मात्र, दारणा धरणातून पाणी उचलताना चेहडी बंधाऱ्याच्या नजीक पाणी मलयुक्त असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे या धरणातून केवळ ३८३ दशलक्ष घनफूट पाणी उचलण्यात आले हेाते. यंदा त्यामुळेच मुकणे धरणातून १३०० ऐवजी १४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मागण्यात आले आहेत. दारणेतून पाणी उचलण्यात अडचणी असल्याने गतवर्षीच्या तुलनेत मागणी निम्म्यावर अर्थात २०० दशलक्ष घनफूट तर मुकणेतून १४०० दशलक्ष घनफूट अशाप्रकारे एकूण ५६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा प्रस्ताव आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे यासंदर्भात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

इन्फो..

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दरवर्षी पाणी आरक्षणाची बैठक होते. यावेळी धरणसाठ्याचा आढावा घेऊन १५ ऑक्टोबर ते ३१ जुलैअखेरच्या २९० दिवसांकरिता पाणी आरक्षण विविध संस्थांसाठी मंजूर केले जाते. गेल्या वर्षी महापालिकेने ५५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी नोंदवली होती. आरक्षित पाणीसाठ्यापैकी ३१ जुलैअखेरपर्यंत ५२९८.८७ दशलक्ष घनफूट पाण्याचा उपसा महापालिकेने केला आहे.

Web Title: Nashik residents want 5600 million cubic feet of water reservation this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.