शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

नाशिकच्या पोलिसांचा नंदुरबारजवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 1:06 AM

राज्यपालांच्या नंदुरबार दौऱ्याचा बंदोबस्त आटोपून गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री मुख्यालयाकडे परतणाºया नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहनास अपघात होऊन त्यात दहा कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात तळोदा- नंदुरबार मार्गावरील पथराई गावाजवळ झाला.

नाशिक : राज्यपालांच्या नंदुरबार दौऱ्याचा बंदोबस्त आटोपून गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री मुख्यालयाकडे परतणाºया नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहनास अपघात होऊन त्यात दहा कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात तळोदा- नंदुरबार मार्गावरील पथराई गावाजवळ झाला.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुरुवारी नंंदुरबार दौºयावर होते. या दौºयानिमित्त नाशिक विभागातील पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आले होते. त्यात नाशिक ग्रामीणच्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी या दत्तक गावी भेट देऊन राज्यपाल कोश्यारी रवाना झाल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस कर्मचारी आपला बंदोबस्त आटोपून नंदुरबार येथील जिल्हा अधीक्षक कार्यालयात जाण्यासाठी प्रवासास लागले असता हा अपघात झाला. नंदुरबारनजीकच्या पथराई गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. चालकाने प्रसंगावधान राखत आपले वाहन रस्त्याच्या खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र वाहन खड्ड्यात आदळल्याने पोलीस व्हॅनमधील १८ पैकी दहा कर्मचारी जखमी झाले. जखमींना तातडीने नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सर्व कर्मचाºयांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस