शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाजे, भगरे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज; मविआचे दिग्गज नेते हजर राहणार

By suyog.joshi | Updated: April 29, 2024 08:56 IST

खा.राऊत, पाटील, थोरात यांची उपस्थिती, नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस मे रोजी मतदान होणार असून तीन मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे

नाशिक - महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे व दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे आज सोमवारी (दि.२९) जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत, जयंत पाटिल व बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित राहणार असून या वेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापणार आहे.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या वीस मे रोजी मतदान होणार असून तीन मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. महविकास आघाडी त्यांच्या उमेदवारांचे आज मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शालिमार येथील उद्धव सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून  सकाळी नऊ वाजता महारॅली सुरुवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढली जाईल. जिल्हाप्रशासनाने दोन्ही उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सकाळी दहा वाजेची वेळ दिली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शांतिगिरी महाराज यांची रॅलीजय बाबाजी परिवाराचे शांतिगिरी महाराज हे देखील नाशिक लोकसभेच्या आखाड्यात अपक्ष उतरले आहे. ते देखील सोमवारी भक्त परिवाराची रॅली काढत शक्तिप्रदर्शन करणार आहे.

टॅग्स :nashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४