शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

Nashik: दीड महिन्याच्या घोळानंतर नाशिकच्या उमेदवारीची माळ हेमंत गोडसे यांच्या गळ्यात, अशा घडल्या घडामोडी

By संजय पाठक | Published: May 01, 2024 1:27 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: तब्बल दीड महिन्याच्या घोळानंतर अखेरीस नाशिकच्या (Nashik Lok Sabha Constituency) जागेचा तिढा महायुतीने सोडवला असून शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे.

- संजय पाठकनाशिक-  तब्बल दीड महिन्याच्या घोळानंतर अखेरीस नाशिकच्या जागेचा तिढा महायुतीने सोडवला असून शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. गोडसे हे चौथ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असून आता त्यांचा सामना उद्धवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी रंगणार आहे. तब्बल दीड महिने नाशिकची जागा शिंदे सेना, भाजपा की राष्ट्रवादीला मिळणार या विषयावर खल सुरू होता. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आल्यानंतर स्पर्धा अधिकृत तीव्र झाली होती दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्यानंतरही महायुतीचा उमेदवार घोषित नसल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला होता.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राजकीय हालचाली गतिमान झाल्या काल दिवसभर भाजपाचे नेते गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून होते तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नाशिकमध्ये येऊन बैठका घेतल्या गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ तसेच माधवगिरी महाराज यांची भेट घेऊन त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला तर बावनकुळे यांनी देखील आज छगन भुजबळ यांची भेट घेतली होती चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच नाशिकच्या जागेवरील भाजपाचा दावा आता नसल्याचे सांगून ही जागा शिवसेनेकडे राहील असे स्पष्ट केले होते.

त्यानंतर आज अपेक्षेनुसार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना शिंदे सेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी करून समर्थकांनी जल्लोष केला हेमंत गोडसे यांनी 2009 मध्ये प्रथम मनसेकडून राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली त्यात त्यांचा 27000 मतांनी पराभव झाला होता त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा ते निवडून आले आहेत 2014 मध्ये त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता तर 2019 मध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला होता आता त्यांचा सामना उद्धवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४nashik-pcनाशिकHemant Godseहेमंत गोडसेShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४