शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा कृषी पर्यटन घोषित करावा

By admin | Updated: September 28, 2016 01:14 IST

जागतिक पर्यटन दिन : कृषी पर्यटन चर्चासत्रात सूर

नाशिक : महाराष्ट्रात ३२८ कृषी पर्यटन केंद्र असून, त्याद्वारे वार्षिक १७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते़ नाशिक जिल्ह्याचा भौगोलिक व ऐतिहासिकदृष्ट्या असलेले महत्त्वच येथील निसर्गरम्य ठिकाणे व आल्हाददायक वातावरण यामुळे कृषी पर्यटनाला चांगला वाव आहे़ नाशिक जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी शासनाने प्रचार - प्रसार व प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून, नाशिकला कृषी पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र स्टेट अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड रुरल टुरिझमचे अध्यक्ष पांडुरंग तावरे यांनी केले़ जागतिक पर्यटन दिनानिमित्त संस्कृती अ‍ॅग्रो टुरिझम (मामाचा मळा) येथे आयोजित कृषी पर्यटनातील संधी या विषयावर ते बोलत होते़ पुढे बोलताना ते म्हणाले की, कृषी पर्यटनामुळे पर्यावरणाचे संवर्धन तर होतेच, पण त्याचबरोबर ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व संवर्धन, स्थानिकांना रोजगार निर्माण होतो़ त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला व गावरान उत्पादनांना एक बाजारपेठ मिळते़ विशेष म्हणजे या कृषी पर्यटनासाठी खूप मोठ्या जमिनीची गरज असते असे नाही, तर पाच एकर शेती असणारे आपल्या शेतातील २० टक्के भाग हा कृषी पर्यटनासाठी वापरू शकतात़ विशेष म्हणजे यासाठी शासनाच्या आठ खोल्यांची परवानगीचीही आवश्यकता नाही़ त्यातच शासनाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कृषी सहल अनिवार्य केली असून, या पर्यटनाच्या कक्षा अधिक रुंदावल्या आहेत़ भारतात दरवर्षी साधारणत: एक कोटी पर्यटक येतात यातील बहुतांशी पर्यटकांना कृषी पर्यटनाकडे साद घालणे सहज शक्य आहे़ असे तावरे म्हणाले़ यावेळी दिलीपसिंह बेनीवाल, तुकाराम बोराडे, मुरलीधर पाटील, उपस्थित होते़ प्रास्ताविक दिग्विजय मानकर यांनी केले़ आभार चंद्रशेखर कापसे यांनी मानले़ (प्रतिनिधी)