Nashik Crime: निवृत्त महिला अधिकाऱ्याची पोटच्या मुलानेच केली हत्या, रक्ताच्या थारोळ्यात सोडला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:25 IST2025-10-07T19:25:06+5:302025-10-07T19:25:33+5:30
Nashik Crime Latest: नाशिकमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. पोटच्या पोरानेच महिलेची हत्या केली.

Nashik Crime: निवृत्त महिला अधिकाऱ्याची पोटच्या मुलानेच केली हत्या, रक्ताच्या थारोळ्यात सोडला जीव
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात हत्याचे सत्र सुरू आहे. यात आणखी एका खुणाच्या घटनेची भर पडली. सोमवारी पहाटे (७ ऑक्टोबर) ४५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. मुलानेच महिलेची धारदार शस्त्राने हत्या केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मंगला घोलप असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मयत महिला विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांनी सेवानिवृत्ती घेतली होती.
मंगला घोलप यांची त्यांचा मुलगा स्वप्निल घोलप यानेच हत्या केली. स्वप्निलने मंगला घोलप यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यातच जीव सोडला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्वप्निल घोलप याला ताब्यात घेतले.
स्वप्निलने त्याच्या आईची हत्या का केली, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस स्वप्निलची चौकशी करत आहेत. दरम्यान, मुलानेच आईची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही वर्षात नाशिकमधील गुन्हेगारी वाढली असून, मागील नऊ महिन्यात नाशिकमध्ये झालेली ४५ वी हत्या आहे. त्यामुळे पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.