Nashik Crime: नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला सहकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार तसेच धर्मातर प्रयत्न प्रकरणी पोलिसांनी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एका रिसॉर्टमध्ये चौकशी केली असून, तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसआयटीने तेथे पंचनामा केला असता तपासाच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपींचे त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील काही विशिष्ट रिसॉर्टमध्ये नेहमी येणे-जाणे असायचे. तेथे नेऊन पीडितेवर अत्याचार तसेच धार्मिक भावनादेखील दुखावण्यात आल्याचा संशय आहे. याबाबतचे महत्त्वाचे अपडेट तपासणीत एसआयटीच्या हाती लागले आहेत. याशिवाय कंपनीतील लॉबी तसेच पॅन्ट्रीचीदेखील तपासणी करून फॉरेन्सिक पुरावे तपास पथकाने ताब्यात घेतले आहे.
देवळालीत कॅम्प पोलिस ठाण्यात २५ मार्चला पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेला विश्वासात घेऊन संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यात आले होते. अटकेतील संशयित मुले पीडित मुलींना नेहमीच बाहेर फिरायला जाण्यासाठी आग्रह धरत. २३ वर्षीय पीडितेने एका टेकडीसह रिसॉर्टमध्ये बळजबरीने नेऊन अत्याचार केल्याची तक्रार दिली होती.
त्यावरून कंपनीचे हजेरी मस्टर तपासणीतून अनेक बाबी समोर येत आहेत. रजा काळात संशयित नेमके कोठे असायचे, असा प्रश्न तपास पथकातील कर्मचारी विचारतात तेव्हा कुटुंबासोबत बाहेरगावी गेलो होतो, दुसऱ्या एका कंपनीत मुलाखतीसाठी गेलो होतो, अशी करणे आरोपी पुढे करत आहेत. मात्र ऑपरेशन मॅनेजर आश्विनी चैनानी हिच्यावरदेखील तपास यंत्रणेला संशय असून, ती आरोपींना ऑनड्यूटी असताना आउट पंच न करता बाहेर जाण्याची मुभा देत होती का, या दृष्टीनेही तपास सुरू असल्याचे समजते.
दुसरी महिला संशयित फरारच
या प्रकरणातील अन्य एक संशयित निदा खान अद्याप फरार असून, तिच्या अटकेनंतर गुन्ह्यासंदर्भात अनेक बाबींचा उलगडा होणार आहे. निदा हीच कंपनीत नोकरीला असताना मुलींना विशिष्ट धर्माचा पेहराव कसा करायचा वैगेरे ट्रेनिंग देत असल्याचे सांगण्यात येते. अटकेतील संशयित आरोपींची ती खास साथीदार होती. तसेच तिचे चैनानी हिच्याशीदेखील चांगले संबंध होते. त्याचा फायदा घेत निदा हिनेच आश्विनीला या साखळीत ओढल्याने आश्विनी पीडितांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Web Summary : A TCS Nashik employee was sexually assaulted and forced to convert religions. Police investigated a resort, seizing CCTV footage. Suspects frequented the resort. A female suspect is on the run; an operation manager under suspicion.
Web Summary : टीसीएस नासिक की एक कर्मचारी का यौन उत्पीड़न किया गया और उसे जबरन धर्म परिवर्तन के लिए मजबूर किया गया। पुलिस ने एक रिसॉर्ट की जांच की, सीसीटीवी फुटेज जब्त किए। संदिग्ध अक्सर रिसॉर्ट आते थे। एक महिला संदिग्ध फरार है; एक संचालन प्रबंधक संदेह के घेरे में है।