शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नासाकाचीही पेटणार ‘चिमणी’?

By admin | Updated: August 25, 2016 01:01 IST

आशा पल्लवित : १३९ कोटींच्या कर्जाचा डोंगर; पालकमंत्र्यांनी मागविली सहकार खात्याकडून माहिती

 नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला जशी सरकारने थकहमी देऊन राज्य शिखर बॅँकेने हमी घेत जिल्हा बॅँकेमार्फत कर्ज देऊन बहुप्रतीक्षित वसाकाचा बॉयलर पेटविला, त्याच धर्तीवर आता नाशिक सहकारी साखर कारखानाही सुरू करण्यासाठी शासनानेच पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. एकीकडे सहकार संपविण्याचे आरोप भाजपा सरकारवर होत असताना दुसरीकडे भाजपाचे नेते जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नासाका सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.त्याचसंदर्भात मंगळवारी (दि.२३) पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सहकार विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून नासाकाबाबत आवश्यक ती माहिती घेतल्याचे कळते. गेल्या दोन वर्षांपासून नासाकाचे संचालक मंडळ बरखास्त असून, नासाकाच्या मालमत्तेवर जिल्हा बॅँकेचा ताबा आहे. यासंदर्भात जिल्हा बॅँकेकडून वेळोवेळी नासाकाच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याचे प्रयत्नही केले गेले आहेत. जिल्हा बॅँकेने नासाकाला ८४ कोटी ५१ लाखांचे कर्ज दिले असून, या कर्जाचे व्याज २९ कोटी ९२ लाख इतके झाले आहे. त्यामुळे आजमितीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे नासाकावर ११४ कोटी ४३ लाखांचे कर्ज आहे. याच कर्जाच्या वसुलीपोटी आतापर्यंत जिल्हा बॅँकेने नासाकाच्या ताब्यात असलेल्या ५७ हजार पोत्यांचा लिलाव करून त्यापोटी प्राप्त झालेली ९ कोटी ५० लाखांची रक्कम सर्वोेच्च न्यायालयात भरली आहे. अद्यापही नासाकाच्या गुदामात १३०० ते १४०० साखरेची पोती पडून आहेत. त्याचाही लिलाव जिल्हा बॅँकेने केला आहे. मात्र त्यापोटीची रक्कम संबंधित व्यापाऱ्याने जिल्हा बॅँकेत न भरल्याने ती साखरेची पोती अद्यापही नासाकाच्या गुदामात आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सहकार विभागाकडून नासाकात असलेल्या यंत्राबद्दल विचारणा केली असून, कारखाना सुरू करता येईल काय? यासह अन्य बाबींची माहिती घेतल्याचे समजते. गेल्या तीन वर्षांपासून नासाकाचे गाळप झालेले नाही. मात्र नासाकातील यंत्रणा सुस्थितीत असल्याची माहिती सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना दिल्याचे कळते. (प्रतिनिधी)