शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावच्या ‘त्या’ जमिनी अखेर मालकांकडे

By admin | Updated: March 31, 2017 01:23 IST

नाशिक :नवीन शर्तीच्या जमिनींचे व्यवहार बेकायदेशीर ठरवून त्या जमिनी शासन जमा करण्याचा मालेगावच्या तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांचा आदेश विभागीय आयुक्तांनी रद्द ठरविला.

नाशिक : नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तीच्या जमिनींचे व्यवहार बेकायदेशीर ठरवून त्या जमिनी शासन जमा करण्याचा मालेगावच्या तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांचा आदेश विभागीय आयुक्तांनी रद्द ठरविला असून, पवार यांच्या आदेशाच्या आधारे जमीनमालकांसह तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्यालाही त्यामुळे चपराक बसली आहे. या जमिनी मूळ मालकांकडे परत देण्यात आल्याने त्यांनी शासनाचा नजराणा बुडवून फसवणूक केल्याचा दावाही फोल ठरला असून, त्याचा परिणाम याबाबतच्या गुन्ह्णावर होणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ज्या जमीनमालकांवर लाचलुचपत कायद्यान्वये गुन्हा दाखल केला त्याच जमीनमालकांनी रामचंद्र पवार यांच्या जमिनी शासनजमा करण्याच्या निर्णयाविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते.त्या अपिलाची सुनावणी नुकतीच पूर्ण होऊन गुरुवारी यासंदर्भातील निकाल देण्यात आला. या निकालात विभागीय अपर आयुक्त ज्योतिबा पाटील यांनी म्हटले आहे की, सदरच्या जमिनी इनामी आहेत की वतनी याचा उलगडा होत नसल्यामुळे त्याबाबत चौकशी करणे अपेक्षित असून, मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी यासंदर्भातील दिलेले आदेश संदिग्ध व त्रोटक स्वरूपाचे असल्यामुळे जमीनमालकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी दिली जावी व पवार यांनी काढलेले शासन जमा आदेश रद्द ठरविण्यात येत आहेत. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयामुळे नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींबाबत गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटण्याची चिन्हे दिसू लागली असली तरी, या निर्णयामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला मोठी चपराक बसली आहे. रामचंद्र पवार यांनी जमिनी शासन जमा केल्याचा धागा पकडूनच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने यासंदर्भात गुन्हा दाखल करून घेताना जमिनींच्या व्यवहारात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा नजराणा बुडवून फसवणूक केली, तसेच रकमेचा अपहार केल्याचा दावा गुन्ह्णात करण्यात आला आहे. मात्र विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निकालात या जमिनी इनामी आहेत की वतनाच्या याचा उलगडाच झालेला नसल्याने त्यांच्या खरेदी-विक्रीत शासनाच्या नजराणा रक्कम बुडविण्याचा किंवा फसवणूक करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा दावा न्यायालयात कितपत टिकेल, याविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.