शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या गतीमंद महिलेला नामपूरवासियांचा आधार

By admin | Updated: April 28, 2017 01:31 IST

एका बाजूला रक्ताच्या नात्याची वीण सैल होत असतानाच नामपूरकरांच्या माणुसकीची वीण मात्र खूपच घट्ट असल्याचा प्रत्यय नामपूरमध्ये नुकताच आला.

शरद नेरकर  नामपूरएका बाजूला रक्ताच्या नात्याची वीण सैल होत असतानाच नामपूरकरांच्या माणुसकीची वीण मात्र खूपच घट्ट असल्याचा प्रत्यय नामपूरमध्ये नुकताच आला. उपचारासाठी मुंबईला नेत असल्याचे सांगणारा पुत्र जेव्हा मनमाड रेल्वेस्थानकावर आपल्या जन्मदात्रीला बेवारस सोडून निघून गेला, तेव्हापासून तब्बल ४९ दिवस एका अनोळखी गतीमंद महिलेचा आईच्या मायेने सांभाळ करून नामपूरवासियांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.गेल्या ४९ दिवसांपूर्वी मनमाड रेल्वे स्टेशनवर शोभा बोरकर या पन्नाशीच्या महिलेला तिचा मुलगा उतरवून निघून गेला. नागपूर येथून मुलगा आईला दवाखाण्याच्या कामासाठी मुंबईला घेवून निघाला होता. मात्र मनमाड रेल्वे स्टेशन येताच त्या निर्दयी मुलाने आपल्या मातेला वाऱ्यावर सोडून दिले. मुळातच गतीमंद असलेली ही महिला फारशी बोलत नव्हती. मनमाड पोलिसांनी तिला बोलते केले. तिने स्वत:चे गाव नागपूर सांगितले मात्र पोलिसांनी ऐकले नामपूर. त्यांनी त्या महिलेस नामपूर येथे नेऊन सोडले.शोभा बोरकर ही धुणे-भांडी करणारी स्त्री! नागपूरपासून ४० कि.मी. अंतरावरील काटोल गावची. पतीच्या निधनाने ऐन तारूण्यातच संसाराचा डाव अर्ध्यावर मोडलेला. एक मुलगा, एक बहीण व आई असा छोटासा परिवार! आई व बहीण दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. व्यसनापायी मुलाने हक्काचे राहते घर विकून मुंबईला उपचारासाठी दवाखान्यात जायचे सांगून मनमाड रेल्वे स्टेशनवरच मातेला सोडून परागंदा झाला. नामपूरला शोभाबाई आली. बसस्थानकावर फिरता फिरता पेट्रोल पंपाजवळ आली. गाव प्रवेशाच्या रस्त्यावर सावलीच्या आडोशाला विसावली. तेथेच ती राहू लागली. कुणी काही दिले तर ते दोन घास पोटात घालायची.दोन-चार दिवसाच्या वास्तव्यात हॉटेल मालक मयूर ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते दिपक सोनवणे यांनी त्या महिलेची विचारपूस करून रोज तिला खायला देऊ लागले. ती गतीमंद असल्यामुळे तिच्या भावना कळत नव्हत्या. मात्र सौ. प्रियंका प्रमोद सावंत, सौ. अनिता विजय सावंत, सौ. रेवती प्रवीण सावंत, सौ. मनिषा शामकांत सावंत व वंदना अशोक सावंत या महिला आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी त्याच रस्त्यावरून जात असताना शोभाबाईचा केविलवाणा चेहरा त्या रोज बघत. एका स्त्रीची भावना फक्त एक स्त्रीच जाणू शकते. याप्रमाणे या पाचही भगिनींनी शोभाबाईला आलटून-पालटून आपल्या घरी नेले, तिचे स्नान, नाष्टा अशी शुश्रूषा सावंत कुटुंबियांतील स्नुषांनी केली. शोभाबाई जेव्हा घरी येई तेव्हा सुरूवातीला ती भेदरलेली वाटायची, अबोल राही. मात्र जेव्हा शोभाबाईस या महिलांबाबत विश्वास, आदरभाव वाटला तेव्हा ती त्यांच्याजवळ मन मोकळे करायची. तिच्या नातेवाईकांशी संपर्क झाल्यानंतर नागपूरला परत जाण्याच्या दिवशी या पाचही महिलांनी शोभाबाईस गोडधोड खाऊ घातले, नामपूरची साडी चोळी दिली. तिला जेव्हा निरोप देण्याची वेळ आली तेव्हा या महिलांबरोबरच पुरूषांचेही डोळे पाणावले. मालेगावहून नागपूरच्या गाडीत बसविण्यासाठी प्रमोद सावंतांनी स्वत:च्या गाडीवर तिला मालेगावपर्यंत आणले. खर्चासाठी ५०० रुपये दिले. दुसऱ्या दिवशी तिच्या आईनेच नामपूरच्या महिलांना फोन करून सांगितले... ‘ताई माझी लेक आली हो! धन्य तुम्ही नामपूरकर! धन्य तुमची माणुसकी!