शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये प्रस्तावित हॉकर्स झोनला नगसेवकांनी घेतला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 20:05 IST

महापालिका : स्वतंत्र महासभा घेण्याचा निर्णय

ठळक मुद्देमहापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी उपविधीचा मसुदा मंजूर करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होतासदर आराखड्यात सुधारणा करण्याची गरज असून त्यासाठी विशेष महासभा बोलाविण्याची सूचना

नाशिक - महापालिकेच्या बुधवारी (दि.३) झालेल्या महासभेत प्रस्तावित हॉकर्स झोनला सदस्यांनी तिव्र आक्षेप घेत त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. दरम्यान, हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र महासभा बोलाविण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केला.
महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी उपविधीचा मसुदा मंजूर करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होता. परंतु, त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला. गुरुमित बग्गा यांनी सांगितले, हॉकर्स झोन निश्चित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही. ज्याठिकाणी गरज नाही तेथे हॉकर्स झोन पाडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सदर आराखड्यात सुधारणा करण्याची गरज असून त्यासाठी विशेष महासभा बोलाविण्याची सूचनाही बग्गा यांनी केली. तोपर्यंत सदर उपविधी मसुद्यास मंजूरी देऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली. मात्र, प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सदर मसुदा आणि हॉकर्स झोनचा आराखडा यांचा काही संबंध नसून ती नियमावली असल्याने त्यास मंजुरी देण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले. सभागृहनेता दिनकर पाटील यांनीही याबाबत स्वतंत्र महासभा बोलाविण्याची सूचना केली. त्यानुसार, महापौरांनी हॉकर्स झोनमध्ये सुधारणा करण्यासाठी महासभा घेण्याचे जाहीर केले. दरम्यान, महासभेत वैद्यकीय विभागाने ठेवलेल्या मानधनावर व आऊटसोर्सिंगद्वारे भरतीच्या प्रस्तावालाही विरोधकांनी विरोध दर्शविला. डॉक्टरांची मानधनावर भरती करण्याबाबतचे रोस्टरच सदस्यांना देण्यात आले नसल्याने सदरचा प्रस्ताव पुन्हा पुढच्या महासभेत सादर करण्याची सूचना डॉ. हेमलता पाटील यांनी केली. मानधनावर दोन बायोमेडिकल इंजिनिअरची पदे भरती करण्याबाबतही विरोधकांनी आक्षेप घेतला. गुरुमित बग्गा यांनी सदरची भरती करण्याऐवजी मेंटेनन्सचे कंत्राट काढण्याची सूचना केली. अखेर महापौरांनी सदरचा प्रस्ताव पुन्हा पुढच्या महासभेवर ठेवण्याचे आदेश दिले.
घंटागाडीप्रश्नी सदस्य आक्रमक
सिडको प्रभाग समितीचे सभापती सुदाम डेमसे यांनी घंटागाडी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव तीन महिन्यांपूर्वी प्रभाग समितीने करुनही दखल घेतली जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. सदर घंटागाडी ठेकेदाराला न्यायालयात जाण्यासाठी प्रशासनाने वेळ दिल्याचा आरोपही डेमसे यांनी केला. भागवत आरोटे, डी. जी. सूर्यवंशी यांनीही ठेकेदाराच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. परंतु, महासभेतही त्याबाबत समाधानकारक उत्तर सदस्यांना मिळू शकले नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका